Jayant Patil ED Inquiry | ‘2024 नंतर ईडी कार्यालयात कोणाला पाठवायचे, याद्या तयार करायला घेतल्या’, जयंत पाटलांच्या ईडी चौकशीवरुन ठाकरे गटाचा इशारा

Jayant Patil ED Inquiry | sanjay raut slams bjp and shinde camp over ncp leader jayant patil ed probe in mumbai

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Jayant Patil ED Inquiry | राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सोमवारी सक्तवसुली संचलनालय (Directorate of Enforcement) अर्थात ईडीकडून चौकशी होणार आहे. जयंत पाटील आज ईडी कार्यालयात हजर राहून चौकशीला (Jayant Patil ED Inquiry) सामोरे जाणार आहेत. या पर्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना सूचक इशारा दिला आहे. 2024 नंतर ईडीच्या कारवाईला कुणाला पाठवायचे आणि किती तास बसवायचे याची यादी आम्ही तयार करत आहोत असा इशारा संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी दिला आहे.

संजय राऊत म्हणाले, विरोधकांवर केंद्रीय तपास यंत्रणेचा (Central Investigation Agency) गैरवापर करुन दबाव टाकला जात आहे. आम्ही लढाई लढत आहोत. जयंत पाटील खंबीरपणे तपासाला सामोरे जात आहेत. राजकीय दबावाचे हे षडयंत्र आहे. काही गोष्टी आम्ही करत नाही, मान्य करत नाही त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन गुडघे टेकवायला लावतात. पण आम्ही ते करत नाही. 2024 नंतर ईडीच्या कारवाईला कुणाला पाठवायचे आणि किती तास बसवायचे याची यादी आम्ही तयार करत आहोत असं संजय राऊत म्हणाले.

चौकशीला हजर राहण्यापूर्वी जयंत पाटलांचे ट्विट

जयंत पाटील यांची ईडीकडून आज चौकशी (Jayant Patil ED Inquiry) होत असल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते
आक्रमक झाले आहे. राज्याभरातून राष्ट्रवादीचे कार्य़कर्ते मुंबईत दाखल होत आहे. कार्यकर्त्यांनी भाजप (BJP) आणि ईडीविरोधात ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान ईडी चौकशीला हजर राहण्यापूर्वी जयंत पाटील यांनी ट्विट केलं आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

आज सकाळी 11 वाजता मी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहे.
ईडीचे समन्स आल्यापासून मला राज्यभरातून माझ्या पक्षातील व इतर मित्र पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे फोन येत
असून राज्यभरातून लोक आज ईडी कार्यालयाबाहेर येत असल्याचे मला समजत आहे.
माझी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विनंती आहे की, कोणीही मुंबईला येऊ नये.
मी या चौकशीकामी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असून आपण सर्वांनी माझ्याप्रती दाखवलेल्या प्रेमाबद्दल
मी आपला आभारी आहे, असं जयंत पाटील ट्वीटमध्ये म्हणाले.

Web Title : Jayant Patil ED Inquiry | sanjay raut slams bjp and shinde camp over ncp leader jayant patil ed probe in mumbai