नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑगस्टमध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीने त्यांच्या जपान युनिटमधील कर्मचार्यांना आठवड्यातून चार दिवस कामावर बोलवले आणि महिन्यात तीन दिवस सुट्टी दिली. ज्यानंतर त्यांनी आश्चर्यकारक परिणाम पाहिले. मागील वर्षांच्या तुलनेत कर्मचार्यांची उत्पादन क्षमता ४०% वाढली असल्याचे त्यांना आढळले.
जपान एक असा देश आहे जिथे कर्मचाऱ्यांकडून ओव्हर-टाइम काम केले जाते. त्याचबरोबर कमी दिवस काम केल्यानंतर रिजल्ट समोर आला त्यानंतर सगळे जण हैराण झाले आहेत. कंपनीने कर्मचाऱ्यांना आठवड्यातून शुक्रवार, शनिवार, रविवार ची सुटी दिली होती. ही सुट्टी ३ दिवसाची होती. त्यामुळे कर्मचार्यांना आठवड्यातून ५ किंवा ६ दिवस काम करावे लागत होते, आता फक्त ४ वर्किंग दिवस होते. ज्यामुळे कर्मचार्यांची उत्पादन क्षमता ४० टक्क्यांनी वाढली.
या सोबतच ऑफिसमध्ये ५९ टक्के कागद कमी वापरला गेला, विजेचा वापर २३ टक्क्यांनी कमी झाला. कोणतीही मिटिंग ३० मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकली नाही. ईमेलला प्रतिसाद लवकर देण्यात आले आणि इतर निर्णय पुढे ढकलण्याऐवजी त्वरित निर्णय घेण्यात आले. या कार्यक्रमात ९४ टक्के कर्मचारी खूश होते.
महिन्याभराच्या या चाचणीला “वर्क लाइफ चॉईस” नीतीचा भाग बनविले होते. ज्याचा उद्देश कर्मचार्यांना अधिक लवचिकपणे काम करण्यास मदत करणे हा होता. देशभरात चालू असलेल्या कामगार सुधारणांच्या दरम्यान कंपनीने ही चाचणी केली.
आठवड्यातील चार वर्किंग डे ची संकल्पना ही कामगार बाजारपेठेतील जागतिक चळवळीचे एक नवीन उदाहरण आहे. या चाचणीमुळे तंत्रज्ञानाची लवचिकता वाढली आहे. यासह, अहवालात असे म्हटले आहे की काही कर्मचार्यांना चार दिवस वर्किंग व तीन दिवस काम ऑफ दिल्यानंतर फायदेशीर परिणाम दिसून आले आहेत.
मायक्रोसॉफ्ट जपानमध्ये, वर्क लाइफ चॉईस चॅलेंज 2019 समर प्रोजेक्टमध्ये ऑगस्टमध्ये शुक्रवारी कर्मचार्यांना सुट्टी देण्यात आली. ही कल्पना कमी वेळात अधिक कार्यक्षम कार्यास प्रोत्साहित करण्याची होती. कंपनीने कर्मचार्यांना “थोड्या वेळात काम करा, आराम करा आणि चांगले शिका” असे सांगितले. मायक्रोसॉफ्ट पुन्हा ही चाचणी करण्याचा विचार करीत आहे. त्याचबरोबर ही चाचणी संपली तेव्हा ९४ टक्के कर्मचारी समाधानी होते.