नवी दिल्ली :वृत्तसंस्था – JanDhan Account | तुमचे सुद्धा जनधन खाते (JanDhan Account) असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय कामाची आहे. जनधन योजना खात्यात याशिवाय सुद्धा अनेक सुविधा आहेत. केंद्र सरकार प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY- Pradhanmantri Jan Dhan Yojna) अंतर्गत झिरो बॅलन्स सेव्हिंग खाते उघडले जाते. यामध्ये अपघात विमा, ओव्हरड्रॉफ्ट फॅसेलिटी, चेकबुकसह अनेक इतर लाभ सुद्धा मिळतात. (JanDhan Account)
जाणून घ्या कसे मिळतील 10 हजार रुपये
जनधन योजनेंतर्गत अकाऊंटमध्ये बॅलन्स नसेल तरीसुद्धा 10,000 रुपयांपर्यंत ऑव्हरड्राफ्टची सुविधा मिळेल. ही सुविधा कमी कालावधीच्या कर्जाप्रमाणे आहे. अगोदर ही रक्कम 5 हजार रुपये होती. सरकारने आता ती वाढवून 10 हजार केली आहे.
हा आहे नियम
या खात्यात ओव्हरड्राफ्टच्या सुविधेसाठी कमाल वयोमर्यादा 65 वर्ष आहे. ओव्हरड्राफ्ट सुविधेचा फायदा घेण्यासाठी तुमचे जनधन खाते किमान 6 महिने जुने असावे. असे नसेल तर केवळ 2 हजार रुपयांपर्यंतच ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जनधन खाते म्हणजे काय?
पंतप्रधान जनधन योजना (PMJDY) सर्वात महत्वाकांक्षी आर्थिक प्रोग्राम आहे जो बँकिंग/बचत तसेच जमा खाते, प्रेषण, कर्ज, विमा, पेन्शनपर्यंत लाभ देते. हे खाते कोणत्याही बँकेच्या शाखेत किंवा व्यवसाय प्रतिनिधी (बँक मित्र) आऊटलेटमध्ये उघडले जाऊ शकते. पीएमजेडीवाय खाते झीरो बॅलन्ससह उघडले जात आहे. (JanDhan Account)
कसे उघडावे खाते?
पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत खाते पब्लिक सेक्टर बँकांमध्ये जास्त उघडले जाते. परंतु तुम्ही खासगी बँकेत सुद्धा तुमचे जनधन खाते उघडू शकता. जर तुमच्याकडे इतर कोणते सेव्हिंग खाते आहे तर तुम्ही ते जनधन खात्यात सुद्धा बदलू शकता. भारतात राहणारा कुणीही नागरिक, ज्याचे वय 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे, जनधन खाते उघडू शकतो.
Web Title :- JanDhan Account | jandhan account holders withdrawing 10000 rupees without minimum balance know how.
Chandrakant Patil | ‘उद्धव ठाकरेंच्या मनात आलं तर मुख्यमंत्रिपदाचा चार्ज…’ – चंद्रकांत पाटील