Jamner Assembly Constituency | देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; जामनेरमधून गिरीश महाजनांऐवजी त्यांच्या पत्नीला उमेदवारी

October 12, 2024

जामनेर: Jamner Assembly Constituency | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) महायुती (Mahayuti) बरोबरच महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) कंबर कसली आहे. संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati), बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि इतर नेते तिसऱ्या आघाडीच्या (Maharashtra Third Front) माध्यमातून लोकांपर्यंत जाणार आहेत. वंचित (Vanchit Bahujan Aghadi- VBA) आणि मनसे (Maharashtra Navnirman Sena-MNS) कडूनही जोरदार तयारी सुरु आहे. तर काही नेते अपक्ष लढण्याच्या भूमिकेत असल्याने त्यांनी मतदारसंघात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून तयारी सुरु केली आहे.

महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या उमेदवारीबाबत मोठी घोषणा केली आहे. गिरीश महाजन यांच्याऐवजी त्यांच्या पत्नीला जामनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीचे तिकीट देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. गिरीश महाजन यांच्यापेक्षा जास्त मते त्यांच्या पत्नीला मिळतील असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

जामनेर येथे शिवसृष्टी व भीमसृष्टी स्मारक अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे.

गिरीशभाऊ तुम्ही यावेळी लढून घ्या, २०२९ मध्ये तुम्हाला तिकीट देणार नाही. २०२९ मध्ये साधना वहिनीच निवडणूक लढणार, असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. गिरीश महाजन यांच्या पत्नीची उमेदवारी थेट जाहीर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” जामनेर तालुक्याचे शिल्पकार गिरीश महाजन यांनी गेल्या ३० वर्षात शहराचाच नव्हे तर जामनेर तालुक्याचा केलेला विकास हा वाखण्या जोगा आहे. त्यांनी एकदा ठरवले की, आपल्याला हे काम करायचे आहे. ते काम हाती घेतल्या नंतर ते पूर्ण झाल्या शिवाय ते स्वस्त बसत नाहीत.

गिरीश महाजन हे साधेसुधे नसुन अस्सल हिऱ्यांसारखे आहेत. जामनेरकर हे पारखी आहेत आणि त्यांची पारख जामनेरकरांना आहे. तसेच गिरीश भाऊ महाजन हे फक्त उमेदवारीचा फॉर्म भरण्यासाठी जामनेरात येतील. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही जामनेरकरांची असेल.

त्यांना कोणीही येथे पराजीत करू शकत नाही. त्यांची कामे करायची सचोटी असल्याने महाजन यांना संकटमोचक म्हणून संबोधित केले जाते. त्यांना सर्वात जास्त मताधिक्याने विजयी करण्याची जबाबदारी जामनेरकरांची असेल”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले.