श्रीनगर : वृत्तसंस्था- जम्मू-काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मद ही अतिरेकी संघटना शिवरात्री निमित्त मोठा आत्मघाती हल्ला करण्याच्या तयारीत आहे. सुरक्षा दलाच्या ताफ्यांवरआणि सामान्य लोकांना लक्ष्य करुन फिदाईन दहशतवादी हल्ला घडविण्याचा कट रचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. यानंतर सुरक्षा यंत्रणा आणि पोलिस ठाण्यांना सतर्क केले आहे. त्याचबरोबर सर्व पोलिस अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या 21 फेब्रुवारीपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, जैशच्या तीन ते चार दहशतवाद्यांचा समूह काश्मीरमध्ये आत्मघाती हल्ले करू शकतो. सीमापार दहशतवादी संघटनांच्या संयुक्त बैठकीत हल्ला करण्याचा कट रचण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काही जैश दहशतवादी पठाणकोट, कठुआ आणि सांबा येथून घुसखोरी करू शकतात.
स्थानिक दहशतवादी सहभागी होण्याची शक्यता
या हल्ल्यात काश्मीरमधील स्थानिक दहशतवादी सहभागी होण्याची शक्यता आहे, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्यात स्थानिक दहशतवादीही वापरण्यात आला होता.
साधूंच्या वेशात दहशतवादी घुसखोरी करू शकतात
गुप्तचर स्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जैश दहशतवादी भिक्षूच्या वेषात घुसखोरी करू शकतात आणि शिवरात्रिनिमित्त कांवंड्यांवरही हल्ला करु शकतात. अशा परिस्थितीत विशेषत: कावड्या जिथून जाणार तिथे सुरक्षा दलांची गस्त वाढविण्यात आली आहे.
जानेवारीत अटक करण्यात आले जैशचे 5 अतिरेकी
यापूर्वी जम्मू-काश्मीर पोलिसांनी जैशचा मोठा कट उधळून लावला होता. प्रजासत्ताक दिनी झालेल्या आत्मघाती हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर पोलिसांनी जानेवारीत जैश-ए-मोहम्मद दहशतवाद्यांना अटक केली होती. अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी एजाज अहमद शेख, उमर हमीद शेख, इम्तियाज अहमद चिकला, साहिल फारूकी गजरी आणि नसीर अहमद मीर यांचा समावेश आहे.