श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीर मधून कलम ३७० हटवल्यापासून भारत पाकिस्तान मधील तणाव आधिकच वाढले आहेत. त्यानंतर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. श्रीनगर मधील परिमपोरा भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये मोठी चकमक उडाली आहे. या चकमकीत एक सीआरपीएफ जवान शहीद झाला असून भारतीय सैनिकांनी २ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
#UPDATE J&K: One injured terrorist has been apprehended by security forces, in Parim Pora, Srinagar. Arms & ammunition recovered. https://t.co/K2RSQSxGlE
— ANI (@ANI) February 5, 2020
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, श्रीनगरच्या लावेपोरा परिसराच्या पोरेम पोरा चेक पोस्टवर अचानक गोळीबाराचा आवाज ऐकू आला. त्यानंतर लवकरच सीआरपीएफच्या जवानांनी मोर्चा ताब्यात घेतला. या भागात आणखी काही दहशतवादी लपून बसू शकतात असे सांगितले जात आहे.
एक जिवंत दहशतवादी ताब्यात
सीआरपीएफ जवळपास शोध मोहिम सुरू आहे. सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याला जिवंत पकडले असून तो जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर अद्यापही चकमक सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.