नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शनिवारी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर भारतीय सैन्याच्या जवानांनी जोरदार जल्लोष साजरा केला. सेलिब्रेशनच्या वेळी सैनिकांनी पाकिस्तान मुर्दाबाद आणि हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या.
एएनआयने सैनिकांच्या या उत्सवाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये काही स्थानिक नागरिकही पाठीमागे उभे असल्याचे दिसून येत आहे. ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर सैनिकांनी हा आनंद साजरा केला.
दरम्यान घाटीच्या रामबन जिल्ह्यात सकाळपासूनच सुरक्षा दले आणि अतिरेक्यांमध्ये चकमक सुरू होती. ज्यामध्ये दुपारी सैन्याला यश आले. भारतीय सैन्याने ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले, मात्र, या चकमकीत एक भारतीय सैनिकही शहीद झाला आहे.
#WATCH Jammu & Kashmir: Indian troops celebrate after eliminating three terrorists in Batote town of Ramban district of Jammu Zone. The civilian hostage has also been rescued safely. pic.twitter.com/L3tec790lg
— ANI (@ANI) September 28, 2019
Visit : bahujannama.com