बहुजननामा ऑनलाईन : जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश सीमेवर सोमवारी भूकंपाचे धक्के जाणवले. हिमाचलच्या चंबा येथे दुपारी १२.१० वाजता भूकंप झाला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ५. ० होती. अर्धा तासात दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान यावेळी कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नसल्याचे समजले आहे.
रविवारी या भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी दुपारी १२.१० वाजता जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील चंबाच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. लोकांना अचानक हे भूकंपाचे धक्के जाणवल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. लोकांनी घराबाहेर पडत मोकळ्या जागी धाव घेतली.
यापूर्वी रविवारी हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात कमी तीव्रतेच्या दोन भूकंपाचे धक्के जाणवले. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, सकाळी ५. ३० वाजता रिश्टर स्केलवर ३. ४ तीव्रतेच्या पहिल्या भूकंपाचे धक्के जाणवले, तर सकाळी ८. ०४ वाजता ४. ९ तीव्रतेचा दुसरा भूकंप झाला. दोन्ही भूकंपांचे केंद्र जम्मू-काश्मीरच्या सीमेला लागून असलेल्या चंबा येथे होते. काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के वारंवार जाणवतात. काश्मीरमध्ये जानेवारीमध्ये रिश्टर स्केलवर तीन तीव्रतेच्या भूकंपाचा तीव्र धक्का जाणवला. दरम्यान, या कालावधीत कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाले नाही.
Earthquake with a magnitude 5.0 on the Richter scale hit Jammu and Kashmir- Himachal Pradesh (Chamba) Border Region at 12:10 PM, today.
— ANI (@ANI) September 9, 2019