नवी दिल्ली वृत्तसंस्था – केंद्र सरकारने कलम ३७० हटविल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये तणावाची परिस्थिती आहे. ती स्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी शोपिया येथे बुधवारी स्थानिक नागरिकांची भेट घेतल्याचा व्हिडीओ समोर आला. त्यानंतर मात्र राजकिय वातावरण तापू लागले आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद यांनी त्यावर वक्तव्य केले आहे.
पत्रकारांनी गुलामनबी आझाद यांना अजित डोवाल यांच्या व्हिडीओवरून प्रश्न विचारला की, ते काश्मीरमधील सामान्य लोकांना भेटत आहेत. तेव्हा आझाद यांनी उत्तर दिले, ‘पैसे देकर आप किसीको भी साथ ले सकते हो.’
#WATCH: Ghulam Nabi Azad, Congress on pictures of National Security Advisor (NSA) Ajit Doval interacting with locals in Shopian yesterday: Paise dekar aap kisiko bhi saath le sakte ho. #JammuAndKashmir pic.twitter.com/iJgwezkeWb
— ANI (@ANI) August 8, 2019
अजित डोवाल बुधवारपासून काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील सामान्य लोकांच्या भेटीगाठी करत आहेत. काही ठिकाणी त्यांनी सामान्य लोकांसोबत जेवण केल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. या दौऱ्यात ते लोकांसोबत जम्मू काश्मीर पोलीस, सीआरपीएफ जवान यांचीही भेट घेतली आहे.
य़ा प्रकरणावरून कॉंग्रेस वेगवेगळ्या भूमिका घेत असल्याचे दिसून येते. कलम ३७० हटविल्याच्या वादानंतर आता गुलाम नबी आझाद श्रीनगरला जाण्याची शक्यता आहे.
#WATCH Jammu and Kashmir: National Security Advisor Ajit Doval interacts with locals in Shopian, has lunch with them. pic.twitter.com/zPBNW1ZX9k
— ANI (@ANI) August 7, 2019