नवी दिल्ली, वृत्तसंस्था – केंद्र सरकारने 31 ऑक्टोबरपूर्वीच महत्वाचा निर्णय घेतला आहे. जम्मू काश्मीरआणि लद्दाख या दोन्ही केंद्रशासित प्रदेश 31 ऑक्टोबरपासून अस्तिस्तवात येतील. केंद्र सरकारने गुजरात केडरचे आयएएस आधिकारी गिरीश चंद्र मुर्मू यांना जम्मू काश्मीरच्या उपराज्यपाल पदी तर आर के माथूर यांना लद्दाखचे उपराज्यपाल म्हणून नेमण्यात आले आहे. एका अधिकारी प्रवक्त्यांनी यावर सांगितले की जम्मू काश्मीरचे राज्यपाल असलेले सत्यपाल मलिक यांना गोवाची जबाबदारी देत गोव्याच्या राज्यापाल पदी नियुक्त करण्यात आले आहे. केंद्र सरकारने मागील 5 ऑगस्टला जम्मू काश्मीर राज्याचा विशेष दर्जा रद्द करत राज्याला दोन केँद्रशासित प्रदेशात विभाजित केले होते.
Girish Chandra Murmu has been appointed as Lieutenant Governor of Jammu-Kashmir. pic.twitter.com/eFSrEhcTce
— ANI (@ANI) October 25, 2019
आता प्रत्येक कर्मचारी 31 ऑक्टोबर पासून केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीर आणि लद्दाखचा सरकारी कर्मचारी होईल. केंद्र सरकारने 5 ऑगस्ट जम्मू काश्मीरमधून 370 कलम रद्द करुन जम्मू काश्मीर आणि लद्दाख असे दोन केंद्रशासित प्रदेश घोषित केले होते. आता जम्मू काश्मीरच्या उपराज्यपाल पदी आयएएस आधिकारी गिरीश चंद्र मुर्मू यांना जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
Radha Krishna Mathur has been appointed as Lieutenant Governor of Ladakh. pic.twitter.com/G2rJ3IZ49d
— ANI (@ANI) October 25, 2019
सत्यपाल मलिक यांना जम्मू काश्मीरच्या राज्यपाल पदावरुन मुक्त करत त्यांना गोव्याचे राज्यपाल पद देण्यात आले आहे, गोव्याच्या राज्यपाल पदी असलेल्या मृदला सिंह यांची जागा सत्यपाल मलिक घेतील. तर राधा कृष्ण माथूर यांच्यावर लद्दाखचे उपराज्यपाल पद सोपवण्यात आले आहे.
PS Sreedharan Pillai has been appointed as the Governor of Mizoram. (File pic) pic.twitter.com/4nYgv0GTeh
— ANI (@ANI) October 25, 2019
कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर केंद्रशासित प्रदेश बनलेल्या या जम्मू काश्मीरमध्ये लेफ्टनेंट गव्हर्नर म्हणजेच उपराज्यपाल नेमण्यात आले आहेत. अर्थ सचिव असलेले मुर्मू 1985 च्या आयएएस बँचचे अधिकारी आहेत. सध्या ते अर्थ विभागाचे अर्थ सचिव ही जबाबादारी संभाळत होते.
पीएस श्रीधरन पिल्लई यांना मिजोरमचे राज्यापाल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
Jammu and Kashmir Governor Satya Pal Malik is transferred and appointed as Governor of Goa. pic.twitter.com/f8FfmVBPCi
— ANI (@ANI) October 25, 2019