नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जामिया यूनिव्हर्सिटीत फायरिंग करणारा अल्पवयीनास त्याच्या कुटुंबियांनी नातेवाईकाच्या लग्नासाठी कपडे खरेदी करण्यासाठी 10 हजार रूपये दिले होते, परंतु आरोपीने त्या पैशांनी कपडे खरेदी करण्याऐवजी पिस्तुल खरेदी केले. पोलिसांच्या चौकशीत हा खुलासा झाला आहे. या अल्पवयीन मुलाने गावातीलच एका तरूणाकडून पिस्तुल खरेदी केले होते. शुक्रवारी फायरिंगमधील आरोपीला ज्युवेनाईल जस्टीस बोर्डद्वारे 14 दिवसांच्या प्रोटेक्टिव्ह कस्टडीत पाठवले होते. चौकशीत समजले की सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपवर मागील 8 महिन्यापासून द्वेष आणि घृणात्मक मजकुर वाचून हा मुलगा कट्टर झाला होता, यामुळे त्याने गुरूवारी जामियामध्ये नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांवर गोळीबार केला.
एका तपास अधिकार्याने सांगितले की, सुमारे दोन वर्षांपूर्वी हा तरूण काही लोकांच्या ऑनलाईन संपर्कात आला होता. या लोकांमध्ये धर्म धोक्यात असल्याच्या विषयावर चर्चा होत होती. हा अल्पवयीन या लोकांच्या पोस्ट आणि व्हिडिओ बारकाईने वाचत होता, पहात होता. या सोबतच तो नागरिकत्व कायद्याविरोधातील शाहीन बाग आणि जामियात सुरू असलेल्या आंदोलनावर व्हॉट्सअपवर खुप सक्रिय होता.हा मुलगा गुरूवारी केवळ दुसर्यांदा दिल्लीत आला होता. पहिल्यावेळी तो दिल्लीत जेव्हा आला, तेव्हा तो केवळ 7 वर्षांचा होता. तपास अधिकार्यांनुसार, हा अल्पवयीन मुलगा एका रोडवेज बसने दिल्लीच्या कालिंदामध्ये उतरला होता.पोलिसांच्या माहितीनुसार तो स्वत:ला खरा राष्ट्रवादी सांगत आहेत.
तो 2018 मध्ये कासगंज हिंसेदरम्यान चंदन गुप्ता यांच्या मृत्यूमुळे दुखी होता. याशिवाय तो अखिल भारत हिंदू महासभेचे कार्यकारी अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्येमुळेही रागात होता. या मुलाने पोलिसांना सांगितले की, धर्मासाठी मी मरू शकतो. मी माझे काम केले आहे. जामियामधील फायरिंगनंतर या मुलास न्यू फ्रेंड्स कॉलनी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांनतर त्यास ग्रेटर कैलाश पोलीस ठाण्यात नेण्यात आले. सायंकाळी त्याला क्राइम ब्रांचकडे सोपवण्यात आले. तेथे कौन्सिलरच्या देखरेखीत त्याची चौकशी करण्यात आली. तर जामिया टीचर्स असोसिएशनने शुक्रवारच्या फायरिंगच्या घटनेचा निषेध केला आहे आणि केन्द्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांना यासाठी जबाबदार धरले आहे. अनुराग ठाकुर यांनी या घटनेच्या काही दिवस अगोदर एका प्रचार सभेत प्रक्षोभक भाषण केले होते. देश के गद्दारोंको गोली मारो, अशा घोषणा दिल्या होत्या.