नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या जामिया नगरमध्ये फायरिंग झाल्याचे वृत्त आहे. एका तरूणाने पिस्तुल दाखवत फायरिंग केले. या गोळीबारात एक तरूण जखमी झाला आहे. जखमी तरूणाला जवळच्या होली फॅमिली रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फायरिंग करणार्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत. जामियाच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान एका विद्यार्थ्याच्या हाताला गोळी लागली आहे, ज्यास होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
#WATCH A man brandishes gun in Jamia area of Delhi, culprit has been detained by police. More details awaited. pic.twitter.com/rAeLl6iLd4
— ANI (@ANI) January 30, 2020
युवक देत होता जय श्री राम आणि वंदे मातरमच्या घोषणा
पिस्तुल दाखवत फायरिंग करणारा तरूण जय श्री राम आणि वंदे मातरमच्या घोषणा देत होता. यासोबतच “हिन्दुस्तान में रहना होगा, वंदे मातरम कहना होगा”, अशी घोषणाही तो देत होता. या दरम्यान, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील पत्रकारितेचा एक विद्यार्थी शादाब हा जखमी झाला आहे.
हवेत फिरवत होता पिस्तुल
नागरिकत्व कायद्याविरूद्ध जामियाच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान गुरूवारी जामिया ते राजघाट असा मार्च काढण्यात आला होता. यावेळी या तरूणाने पिस्तुल काढून दाखवत दहशत निर्माण केली.
जाणून घ्या काय म्हणत आहेत, दिल्लीचे पोलीस अधिकारी
जामियाच्या विद्यार्थ्यांच्या मार्चदरम्यान गोळीबार झाल्याच्या घटनेबाबत दिल्ली पोलीस दलाचे डीसीपी चिन्मय बिसवाल म्हणाले, आम्हाला माहिती घ्यावी लागेल की काय घटना घडली आहे. सर्व परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मार्च दरम्यान ही घटना घडली आहे. पोलीस याबाबत माहिती घेत आहेत.