जळगाव न्यूज : Jalgaon News बहुजननामा ऑनलाईन – जळगाव (Jalgaon) येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील (District Superintendent of Police Office) महिला दक्षता समितीच्या कार्यालयासमोर दोन गटात हाणामारी झाली आहे. हा प्रकार शुक्रवारी (16 जुलै) दुपारी घडला. या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. Jalgaon News | Two groups clashed at Jalgaon District Superintendent of Police office
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जळगावच्या जामनेर (Jamner) तालुक्यातील वाकोद येथील एका तरूणीचा विवाह औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण (Paithan) तालुक्यातील एका युवकाशी 4 महिन्यांपुर्वी झाला होता.
यांनतर काही कौटुंबिक वाद निर्माण झाला. यातून त्यांच्यातला वाद टोकाला पोहचला.
2 महिन्यातच वाद विकोपाला गेल्यावर महिला दक्षता समितीकडे (Women’s Vigilance Committee) तक्रार दाखल करण्यात आली होती.
दरम्यान, यांनतर तरुण-तरुणीकडची दोन्ही गटातील मंडळी आज (शुक्रवारी) जळगाव पोलीस अधिक्षक कार्यालयात जमली होती.
तर, दक्षता समितीतील कामकाज आवरल्यानांतर बाहेर पडल्यानंतर दोन्ही कुटुंबियांमधील शाब्दीक वाद झाला. यांनतर वाद हा त्यांच्यात हाणामारीवर पोहोचला.
हाणामारीत फायटरसारख्या वस्तूचा देखील वापर करण्यात आला.
हा गोंधळाचा प्रकार घडल्यानंतर येथील पोलिस कर्मचाऱ्यानी सोडवासोडव केली.
दरम्यान, या तुंबळ हाणामारीत दोघे जखमी झाले आहेत.
त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
Web Title : Jalgaon News | Two groups clashed at Jalgaon District Superintendent of Police office
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update