Jalgaon Crime News | दुर्दैवी ! आत्तेभावाच्या लग्नाला जाताना 37 वर्षीय महिलेचा अपघात; जळगावमधील घटना

 Jalgaon Crime News | jalgaon women died in two wheeler and dumper accident

जळगाव : बहुजननामा ऑनलाईन Jalgaon Crime News | जळगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आत्याच्या मुलाच्या लग्नाला जात असताना एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शेजारी राहणाऱ्या कृषीकेंद्र चालकासोबत दुचाकीवरुन निघालेल्या विवाहितेचा डंपरने दिलेल्या धडकेत डंपर पायावरुन गेल्याने मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास पाळधी गावाजवळील हॉटेल गोविंद समोरील महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. कविता प्रशांत चौधरी असे या अपघातात मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. तसेच विलास देवीदास चौधरी हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. (Jalgaon Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

काय आहे नेमके प्रकरण?

झुरखेडा येथील रहिवासी कविता चौधरी यांची आत्या जळगाव शहरातील शिव कॉलनीत राहतात. आत्याच्या मुलाच्या हळदीचा सोमवारी कार्यक्रम होता. कविता चौधरी यांच्या शेजारी राहत असलेले विलास देवीदास चौधरी यांचे जळगावात कृषीकेंद्र आहे. ते दररोज दुचाकीने जळगावला ये जा करत असतात. त्यामुळे कविता चौधरी या सोमवारी विलास चौधरी सोबत दुचाकीवरुन जळगावला हळदीच्या कार्यक्रमासाठी निघाल्या. (Jalgaon Crime News)

 

यादरम्यान पाळधीच्या पुढे गोविंद हॉटेलसमोर भरधाव वेगाने मागच्या बाजूने येणाऱ्या डंपरने (जी.जे-03, बी.वाय-6831) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार विलास चौधरी आणि कविता प्रशांत चौधरी हे रस्त्यावर फेकले गेले. यात दोन्ही पायावरुन डंपरचे चाक गेल्याने कविता चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला, तर विलास चौधरी यांच्या डोक्याला, पाय आणि डोळ्याला गंभीर दुखापत होऊन ते जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी जळगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजत आहे.

 

या घटनेची माहिती मिळताच पाडळसरे, झुरखेडा आणि पाळधी येथील नातेवाईक आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
यानंतर त्यांनी डंपर ताब्यात घेतला. या अपघातानंतर डंपरचालक घटनास्थावरून फरार झाला आहे.
पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
कविता चौधरी यांच्या पश्चात पती, 14 वर्षांचा मुलगा सत्यम आणि 12 वर्षीय मुलगी भूमिका असा परिवार आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Jalgaon Crime News | jalgaon women died in two wheeler and dumper accident

 

हे देखील वाचा :

Karuna Munde | ‘रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवा’ – करूणा मुंडे

Maharashtra Political Crisis | निवडणूक आयोगासह केंद्रीय यंत्रणा शिंदे गटाला गोपनीय माहिती पुरवतोय; ठाकरे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप