जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – Jalgaon Crime | जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon Crime) एक थरारक घटना समोर आली आहे. भरधाव आयशर (Eicher) गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या घरात घुसल्याने हमाली काम करणाऱ्या युुवकाचा जागीच मृत्यू (Died) झाला आहे. त्याचबरोबर दुसरा गंभीर जखमी (Seriously injured) झाला. ही धक्कादायक घटना आज (शनिवार) सकाळच्या सुमारास घडली आहे.
सम्राट दादाराव इंगळे (Samrat Dadarao Ingle) (वय, 19) असं मृत्यु झालेल्या युवकाचे नाव आहे. तर निलेश इंगळे (Nilesh Ingle) हा जखमी अवस्थेत आहे. (Jalgaon Crime)
याबाबत माहिती अशी की, सम्राट इंगळे हा घरात सकाळी अंघोळ करीत होता. त्याचवेळी भरधाव आयशर त्याच्या घरात घुसला आहे. त्यात सम्राटचा जागीच मृत्यु झाला आहे. आयशर चालकाने साकेगाव ते भुसावळ (Sakegaon to Bhusawal) दरम्यान 5 ते 6 मोटारसायकल स्वारांना कट मारल्याची देखील माहिती समोर येत आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिस (Police) घटनास्थळी दाखल झाले आहेत. यानंतर पुढील तपास सुरु आहे.
Web Title :- Jalgaon Crime | Eicher tempo enter into the house young man died while taking a bath in jalgaon
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update