पुणे : बहुजननामा ऑनलाईन – शिवसेना नेते युवासेनाप्रमुख पर्यावरण,पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 10,000 फेस मास्क व 100 लिटर सॅनिटायझर ससून रुग्णालयास भेट देण्यात आलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना महामारी विरोधात लढत असलेल्या ससून रुग्णालयातिल डॉक्टर, परिचारिका, सर्व आरोग्य कर्मचारी यांससाठी 10,000 *फेस मास्क व 100 लिटर सॅनिटायझर शिवसेना पुणे उप शहर प्रमुख किरण साळी यांचा वतीने ससून रुग्णालयाचे डीन डॉ. तांबे व डॉ. हरिष टाटिया त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले,
यावेळी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे शिवसेना उपनेत्या ,विधान परिषद उपसभापती मा,आ.डॅा. निलमताई गोऱ्हे यांनी डॉ. तांबे यांच्याशी संवाद साधला. यावेळेस नीलमताई गोऱ्हे यांनी आपल्या आमदार निधीतून पाच लाख रुपयांन पर्यंतची पी.पी.टी कीट, फेस मास्क, सॅनिटायझर व इतर आवश्यक साहित्य देण्याचे आश्वासन दिले व करोना च्या पार्श्वभूमीवर रुग्णालय,डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी उत्तम काम करत आहे, यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या व आभार मानले.
ससून रुग्णालयाचे डीन डॉ. तांबे यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रीआदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या मास, व सॅनिटायझरच्या मदती साठी पत्राद्वारे आभार व्यक्त केले. यावेळी सुनील महाजन, शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी आकाश शिंदे, प्रशांत कदम, सागर अलकुंटे, निखिल बलकवडे, ॲड तेजस दंडगवाळ, आकाश थाेरात, प्रतिक गवते, किरण बदामी, राेहीत कदम हे उपस्थित होते.