नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इस्रोने अंतराळात मानवी ‘रोबो’ पाठवण्याची तयारी केली असून गगनयान प्रकल्प पूर्ण करण्यासाठी इस्रोकडून कंबर कसण्यात आली आहे. २०२२ च्या सुरुवातीच्या महिन्याचे उद्दिष्ट मानवयुक्त अंतराळ उड्डाणासाठी समोर ठेवले आहे. गगनयानापूर्वी इस्रो व्योममित्र अंतराळात पाठवणार असून तेथे इस्रो मानवी शरीरांच्या क्रियांचा अभ्यास करणार आहे. त्यासाठी एक अर्धा ह्युमनॉइड म्हणजे रोबो अंतराळातून इस्रोला रिपोर्ट पाठवणार असून बुधवारी हा रोबो इस्रोकडून जगासमोर आणला आहे.
इस्रोचे वैज्ञानिक सॅम दयाल यांनी व्योममित्र अंतराळात मानवी शरीराच्या क्रियांचा अभ्यास करून अहवाल पाठवेल. याकडे आम्ही एक परीक्षण म्हणून पाहत आहोत, असे सांगितले आहे. व्योममित्र एक खास रोबो असून तो बोलू शकतो, असे म्हटले जात आहे. तसेच तो माणसालाही ओळखू शकतो. हा रोबो अंतराळवीर जे काम करतील त्यांची नक्कलही करू शकेल.
व्योममित्र संवाद साधत लोकांच्या प्रश्नांची उत्तरही देऊ शकतो. इस्रोनेच हा रोबो विकसित केला असून बंगळूरमध्ये त्याचे सादरीकरण करण्यात आले होते. या व्योममित्राने हाय, मी हाफ ह्युमनॉइडचा पहिला प्रोटोटाइप आहे, असे अभिवादन करताना म्हटले. या रोबोला पाय नसल्यामुळे हाफ ह्यूमनॉइड म्हटले जाते.
तसेच दयाल म्हणाले की हा रोबो फक्त पुढे आणि बाजूलाच वाकू शकतो. अंतराळातून हा रोबो कमांड सेंटरच्या संपर्कात राहील. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार इस्रो २०२२ च्या नियोजित वेळेच्या आतच भारताचे पहिले मानवविरहित अंतराळ मिशन गगनयान साकारण्यासाठी जोरदार तयारी करत असून या अभियानाचा उद्देश भारतीयांना अंतराळ यात्रेला पाठवून सुरक्षित परत आणणे हा आहे.
Humanoid for Gaganyaan unveiled. This is the prototype humanoid which will go as trial before #gaganyaan goes with astronauts. This humanoid speaks too and is named Vyom Mitra . pic.twitter.com/TKX6pbLyrb
— Prasar Bharati News Services & Digital Platform (@PBNS_India) January 22, 2020