पत्नी भाजप कडून पंचायत समिती सदस्या असताना पती चा काँग्रेसमध्ये प्रवेश
नांदेड :(माधव मेकेवाड) बहुजननामा ऑनलाईन – आजवर प्रचार व प्रसार प्रताप पा चिखलीकर यांचा करून चक्क भाजपा ला सोड चिट्टी देऊन भोकर पंचायत समितीच्या सदस्या सागरबाई गणपत जाधव यांनी भारतीय जनता पक्ष कडून पंचायत समिती सदस्या झाल्या त्यांच्या प्रचार व प्रसार निवडून आणण्यासाठी त्यांच्या पती गणपत मनोहर जाधव यांनी अपार कष्ट घेतले पण त्यांनी आज पर्यंत भाजप मध्ये राहून ते स्वतः एकटे काँग्रेस चव्हाण यांच्याशी हाथ मिळवणी केली असल्याची चर्चा सोसिल मीडिया वर जोरात आहे.काँग्रेस मध्ये अशोक चव्हाण यांच्या शिवाजी नगर येथील निवास स्थानी प्रवेश केला.सागर बाई जाधव ह्या भाजपा कडून पंचायत समिती निवडणूक लढवली पण त्या भाजपा पार्टी सोडण्यास नकार दिल्या त्या मुळे गणपत जाधव यांनी एकटेच काँग्रेस पक्षाच्या धोरणात चालणे पसंद केले असल्याची चर्चा भोकर तालुक्यात सुरू आहे.
त्या भाजपा पक्षाच्या तिकिटावर वर निवडून येऊ मात्र भाजप सरकारची कामे पाहून त्या भाजप मध्ये राहणे पसंद केले त्यांचे पती मात्र वेगळा पक्षा मध्ये जाणे पसंद केल्याने राजकीय वर्तुळात अनेक प्रकारे मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. भाजपा भोकर पंचायत समिती सदस्या सागरबाई गणपत जाधव यांचे पती गणपत मनोहर जाधव यांनी मात्र कॉंग्रेसचे अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करणं पसंद केले असल्याचे समजले आहे.त्यांनी चक्क अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन पक्ष प्रवेश केले असल्याचे समजले आहे.पत्नी करणार प्रताप पा चिखलीकरांचा प्रचार तर पती करणार काँग्रेस अशोक चव्हाण यांचा प्रचार असेच चित्र काही दिवसात दिसेल.यामुळे निवडणूक अजून जास्त रंगतदार होईल अशी देखील चर्चा भोकर शहरात या वेळी लोकसभेची सुरू आहे.
अशोक चव्हाण यांना नांदेड मध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या अनेक जण राजकीय गुरू मानतात.पक्ष फोडा फोडीच राजकारण सध्या भाजपा सरकार कडून सूरु आहे अशी टीका अनेक वेळा काँग्रेस च्या व्यासपीठावर अशोक चव्हाण करत आहेत. मोदी सरकारच पारड जड व भक्कम असताना त्याच भाजप सरकार ने दिलेली आश्वासन पाळली नसल्याने भोकर पंचायत समितीच्या महिला सदस्याचे पती गणपत मनोहर जाधव यांनी चक्क काँग्रेसशी हातमिळवणी केली असल्याने आता नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.एकीकडे काँग्रेस कडे मताधिक्य पुरेशी नसलेली चर्चा जिल्हा भर पसरली असल्याने नेमकं कोणता उमेदवार निवडून येईल हे मात्र नक्की अजूनही सांगता येत नाही अशे हाल नांदेड लोकसभेचे झाले आहे. अहमदनगर चा पॅटर्न पेक्षा ही भारी पॅटर्न भोकर तालुक्यात घडला असल्याची चर्चा सुरू आहे.
अशोक चव्हाण यांच्या प्रचारार्थ त्यांच्या दोन्ही मुली व त्यांच्या पत्नी व अनेक निकट वृत्तीय पदाधिकारी काँग्रेस पक्षाचा जोमाने प्रचार करताना दिसून येत आहेत.गणपत मनोहर जाधव यांनी अशोक चव्हाण यांच्या हस्ते पक्ष प्रवेश करून घेत असताना भोकर काँग्रेस पार्टी चे ता.अध्यक्ष तथा सभापती जगदीश पा भोसीकर,रामचंद्र मुसळे(संचालक),महिला तालुका अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, सुरेश चटलावार,सुभाष चटलावार,आनंदराव देशमुख,लक्ष्मण डोंगरे,गणेश बंडेवार आदी जण उपस्थित होते.