नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिजम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) ची एक नकली वेबसाइट सुरू असून, यामध्ये रेल्वे प्रवाशांनी बुकिंग केल्यानंतर चूना लावला जात आहे. आता कंपनीने स्वत:च अलर्ट जारी करत या वेबसाइटपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. आयआरसीटीसीच्या अनेक वेबसाइट आहेत. यापैकी काही वेबसाइटवर लाखो लोक रोज तिकिट बुक करतात. यापैकी एक वेबसाइट अशी आहे, जेथे प्रवाशी कंपनीकडून संचालित टूर पॅकेजसाठी बुकिंग करतात. याचीच एक नकली वेबसाइट सुरू असून त्यावर प्रवाशांना लुटले जात आहे. आतापर्यंत आयआरसीटीसीकडे फसवणुकीची दोन प्रकरणे आली आहेत, ज्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयआरसीटीसीने म्हटले आहे की, काही लोक कंपनीच्या नावाने मिळती जुळती वेबसाइट चालवत आहेत, ज्यावर लोकांची फसवणूक केली जात आहे. आयआरसीटीसी केवळ www.irctctourism.com ही वेबसाइट चालवते. या वेबसाइटवर रेल्वे टूर, विमान टूर, हॉटल व क्रूज पॅकेज बुक केले जाते. तर फ्रॉड वेबसाइट dmo irctctour.com अशी आहे. या वेबसाइटचे व्हाऊचर हुबेहुब आयआरसीटीसीच्या व्हाऊचरप्रमाणे आहे. या वेबसाइटचा मोबाईल नंबर 9999999999, लँडलाइन नंबर 6371526046 आणि ईमेल आयडी [email protected] आहे. रेल्वेच्या हे सर्व निदर्शनास येऊनही रेल्वे आणि केंद्राचे सायबर खाते यावर कोणतीही कारवाई करत नसल्याने प्रवाशी हे रेल्वे आणि सायबर खात्यावर देखील संशय व्यक्त करत आहेत.
आयआरसीटीसीने आपल्या वेबसाइटवर लोकांना सावध करण्यासाठी एक सूचना दिली आहे, यात म्हटले आहे की, irctctour.com अधिकृत वेबसाइट नाही. जर कुणी व्यक्ती या वेबसाइटवर ट्रान्जेक्शन करत असेल तर त्यास तो स्वता जबाबदार असेल. या फसवणुकीची जबाबदारी आयआरसीटीसीची नाही. रेल्वेने एवढी सूचना देऊन हात वर केले आहेत. मात्र, बोगस वेबसाईटवर कोणतीही कारवाई करण्यासाठी पाऊल उचलले नसल्याने फसवणूक झालेले प्रवाशी संताप आणि संशय व्यक्त करत आहेत.
Visit : bahujannama.com