मुंबई :बहुजननामा ऑनलाइन – IPL 2022 | कोरोनाचा फटका आयपीएल (IPL) लाही बसला आहे. आता पुढील पर्वाच्या तयारीला सुरुवात झाली असून बीसीसीआय (BCCI) यासंदर्भात लवकरच घोषणा करणार आहे. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे दोन नवीन संघांचा समावेश करण्यात येणार आहे. ऑक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून नव्या संघांसाठी मूळ किंमत दोन हजार कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. यानंतर खेळाडूंचा महालिलाव डिसेंबरमध्ये होणार आहे. दरम्यान या पूर्वीही मे महिन्यात नवे संघ निवडीची प्रक्रिया सुरु होती. मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे हा लिलाव स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा हि प्रक्रिया सुरु झाली असून नव्या संघांच्या शर्यतीत अहमदाबाद, पुणे, लखनऊ आणि इंदूर(Ahmedabad, Pune, Lucknow and Indore) सर्वांत आघाडीवर आहेत.
IPL 2022 | there will be two new teams ipl mahalilav december 2022
गतवर्षापर्यँत प्रत्येक संघाची मूळ किंमत एक हजार ५०० कोटी ठेवण्याचा विचार सुरू होता, मात्र राजस्थान रॉयल्समध्ये झालेल्या बदलानंतर बोर्ड फेरविचार करीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार कोटी किंमत मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर चार खेळाडूंना रिटेन करण्याची योजना येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खेळाडू रिटेन नियमात बदल करण्याचा विचार सुरु आहे. या नियमानुसार आधी पाच खेळाडूंना रिटेन करण्यास मुभा देण्यात आली होती. ती आता चारपर्यंत मर्यादित असेल. यात तीन भारतीय आणि एक विदेशी किंवा दोन भारतीय आणि दोन विदेशी असा पर्याय दिला जाईल. जर तीन खेळाडू रिटेन केल्यास फ्रॅन्चायजीच्या रकमेतूनही कपात केली जाईल. ती साधारण १५ कोटी, ११ कोटी आणि ७ कोटींची असेल. तर दोन खेळाडू घेतल्यास १२.५ आणि ८.५ कोटी कापले जातील. एक खेळाडू रिटेन केल्यास १२.५ कोटी कपात केली जाईल.लिलावाच्या नियमांतही बदल केले जाणार असल्याचे बोलले जाते. त्यानुसार वेतनकॅप ८५ कोटींवरून ९० कोटींपर्यंत जाईल. दहा संघ असल्यास किमान ५० कोटी रुपये वेतन कॅपमध्ये जातील. यामध्ये फ्रॅन्चायजीला यापैकी ७५ टक्के रक्कम खर्च करावी लागेल आगामी ३ वर्षांत वेतन कॅप १०० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
कोणत्या संघाची किती कोटींमध्ये विक्री
संघ किंमत
मुंबई इंडियन्स ८३३
रॉयल चॅलेंजर्स ८३१
डेक्कन चार्जर्स ७९७
चेन्नई सुपरकिंग्स ६७७
दिल्ली डेअरडेव्हिल्स ६२५
किंग्स इलेव्हन पंजाब ५६६
केकेआर ५५९
राजस्थान रॉयल्स ५००
web title:IPL 2022 | Mahalilav of players in December for the next edition of IPL; Two new teams will also come
Baramati Police News | बारामती पोलिस उपमुख्यालयासाठी 300 पदे भरण्यास मंजूरी