मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – लवकरच महाराष्ट्रात मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक, इन्स्ट्रमेंटेशन, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्ऱ़ॉनिक आणि इलक्ट्ऱॉनिक्स टेक्निशिअनच्या 190 पदांची भरती सुरु होणार आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. 364 टेक्निकल तर 136 नॉन टेक्निकल ट्रेड अप्रेंटिसशीप पदांसाठी भरती आहे.
या 500 पैकी 297 पदे महाराष्ट्रात आहे. याशिवाय 30 पदे फिटर, इलेक्ट्रिशिअन, मशीनिस्ट, इलेक्ट्ऱॉनिक्स, इन्स्ट्यूमेंटची आहे. डेटा एन्ट्री ऑपरेटरसाठीही फ्रेशर्स घेण्यात येणार आहे. फेशर्सची 9 पदे आणि स्कील सर्टिफिकेट डोल्डरची 9 पदे आहेी. अर्ज करण्याची अंतिम मुदत 20 मार्च 2020 आहे. परीक्षा 29 मार्च 2020 रोजी होणार आहे.
शैक्षणिक योग्यता :- वेगवेगळ्या पदांनुसार त्या त्या शाखेतील डिप्लोमा, आयटीआय व अन्य शैक्षणिक पात्रता संकेतस्थळावर पाहता येईल.
कुठे अर्ज करायचा ?
iocl.com या इंडियन ऑइलच्या अधिकृत संकेसस्थळावरुन ऑनलाइन अर्ज तुम्हाला करता येईल. महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगडमध्ये देखील ही अप्रेंटिसशीप भरती होणार आहे.