नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – निवृत्तीनंतर आर्थिक दृष्टीने आत्मनिर्भर राहणे प्रत्येकाची गरज असून त्यांच्यासाठी तशा योजनाही आहेत. यासाठीच्या एका योजनेत पंतप्रधान वया वंदना योजनेचा समावेश असून सरकारी योजनेत गुंतवलेल्या पैशावर आपल्याला ८ ते ८:३० टक्के व्याज मिळत आहे. पण हे व्याज मासिक, तिमाही आणि सहामाही किंवा वार्षिक पर्यायांवर अवलंबून असून आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ३१ मार्च २०२० पर्यंतचा कालावधी आहे.
काय आहेत योजनेचे फायदे?
या योजनेसाठीची मर्यादा १० वर्षांची असून त्यानंतरही योजना कार्यान्वित ठेवू शकता. त्यासाठी पुन्हा योजनेत गुंतवणूक करावी लागेल. पेन्शनधारक १० वर्षांनंतरही जिवंत राहिला तर संबंधित व्यक्तीला एरियरही दिला जाईल. तसेच या योजनेचा कालावधी पूर्ण होण्याअगोदरच पेन्शनधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना उर्वरित रक्कम दिली जाते. आणि या योजनेचा कालावधी पूर्ण झालावरही व्यक्ती जीवनात राहिला तर त्याच्या योजनेच्या खरेदी रकमेसह शेवटच्या पेन्शन दिली जाते.
या योजनेचा लाभ ६० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ नागरिक घेऊ शकतात. या योजनेसाठी वयाची मर्यादा जास्त नसून जर मासिक पेन्शन मिळवायची असेल तर महिन्याला कमीत कमी १ हजार रु.ची पेन्शन मिळू शकते. किती कालावधीसाठी तुम्ही पेन्शन मिळवणार आहात ते पेन्शनच्या रकमेवर अवलंबून असून या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त मासिक पेन्शन १०,००० रु. मिळते.
LIC च्या माध्यमातूनही मिळू शकतो योजनेचा लाभ –
केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या बजेटमध्ये वरिष्ठ नागरिकांच्या योजनेची शेवटची तारीख वाढवत ३१ मार्च २०२० केली असताना त्याची मर्यादा वाढवून १५ लाख रु. केली आहे. तुम्ही ही योजना एलआयसीच्या माध्यमातूनही घेऊ शकता. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने ही योजना मिळवू शकता. प्रधानमंत्री वय वंदना योजनेत पेन्शनचे वय ६० वर्षं असून जास्तीत जास्त १५ लाख रुपये गुंतवता येतात.
असा करा अर्ज –
पंतप्रधान वय वंदना योजनेच्या ग्राहकांना LIC ची वेबसाइट लिंक https://eterm.licindia.in/onlinePlansIndex/pmvvymain.do यावर जाऊन अर्ज करावा लागेल. योजनेचा फॉर्म भरून आवश्यक दस्तावेज लागोपाठ LIC च्या कोणत्याही कार्यालयात जाऊन जमा करावेत. या योजनेसाठी ऑनलाइन सुविधाही देण्यात आली आहे.
गुंतवणुकीसाठी लागतात ही कागदपत्रे –
१. वास्तव्याचा पुरावा
२.पॅन कार्डची कॉपी
३. बँकेच्या चेकची कॉपी किंवा बँक पासबुकच्या पहिल्या पानाची कॉपी
किती असेल पेन्शन ?
या योजनेंतर्गत १ हजार रुपये ते १० हजार रुपयांपर्यंत पेन्शन दिली जाते. प्रतिमहिना १ हजार रुपये पेन्शन हवी असेल तर १,५०,००० रुपये जमा करावे लागणार आहेत. तसेच जर १०,००० रुपये प्रतिमहिना पेन्शन हवी असल्यास १५,००,००० रुपये जमा करावे लागतील.