नवी दिल्ली : वृत्त संस्था – जर तुम्ही कोरोना काळात म्युच्युअल फंडमध्ये पैसे लावण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली बातमी आहे. आजपासून तुम्ही केवळ 5000 रुपये लावून मोठा नफा कमाऊ शकता. फंड हाऊस मिराए एसेटने भारतात पहिल्यांदा दोन पैसिव्ह NYSE FANG+ फंड्स लाँच केले आहेत. हे दोन्ही फंड 19 एप्रिल 2021 म्हणजे आज ओपन होत आहे. तर, कंपनीच्या लार्ज कॅप फंडने मागील एक वर्ष गुंतवणुकदारांना 57.1 टक्केचा रिटर्न देऊन मालामाल केले आहे. याबाबत सर्व डिटेलमध्ये जाणून घेवूयात…
यामध्ये कंपनीचे पहिले प्रॉडक्ट मिरे एसेट NYSE FANG+ ETF’ आहे. ही एक ओपन-एंडेड स्कीम आहे, जी NYSE FANG+ Total Return Index दर्शवते. तर, दूसरे प्रॉडक्ट मिरे एसेट NYSE FANG+ETF Fund of Fund आहे. ही ओपन एंडेड फंड ऑफ फंड स्कीम आहे, जी Mirae Asset NYSE FANG+ETF मध्ये गुंतवणूक करते. NFO च्या दरम्यान या दोन्ही स्कीममध्ये तुम्ही केवळ 5000 रुपयांनी सुरुवत करू शकता. ईटीएफसाठी ही 30 एप्रिल 2021 ला बंद होईल.
टॉप कंपन्यांमध्ये सहभागी
बोस्टन कन्सल्टन्सी ग्रुपनुसार न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज म्हणजे NYSE FANG+Index मध्ये सहभागी 10 पैकी 7 कंपन्यांनी 2020 च्या 50 प्रमुख कंपन्यांमध्ये स्थान पटकावले आहे.