नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्याची आर्थिक स्थिती पाहता नजीकच्या काळात व्याजदर वाढण्याची शक्यता दिसत नाही. अशावेळी एक स्मार्ट गुंतवणूकदार म्हणून तुम्हाला बचतीच्या अन्य पर्यायांकडे सावधगिरीने लक्ष द्यावे लागेल. वाढत्या महागाई दरामुळे फिक्स्ड डिपॉजिट हा चांगला पर्याय नाही. अशा स्थितीत मोठ्या कालावधीच्या गुंतवणुकीतून जास्त उत्पन्न मिळावायचे असेल तर तुमच्यासाठी इक्विटी म्यूच्युअल फंड्स एक चांगला पर्याय आहे. टॅक्सपासून जास्त रिटर्नच्या बाबतीत हा फिक्स्ड डिपॉजिटपेक्षा चांगला पर्याय आहे. याची तुलनात्मक माहिती आपण घेऊयात.
रेग्युलर इन्कमसाठी काय आहे एफडीचे गणित
असे समजा तुमच्याकडे 1 करोड रुपयांची बचत आहे आणि तुम्हाला यातून रेग्युलर इन्कम हवे आहे. बँकेत एफडीद्वारे 1 वर्षात ही रक्कम 1.07 करोड रुपयेच होऊ शकते. एकुण तुम्हाला यामध्ये 7 लाख रुपयांची कमाई होईल. म्हणजे 58,000 हजार रुपये प्रती महीना. जर महागाई दर 5 टक्के आहे तर 1 करोड रुपयांची बचत करण्यासाठी तुम्हाला 1.05 करोड रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यानंतर तुमच्या जवळ 2 लाख रुपयेच शिल्लक राहतील. जे प्रती महिना केवळ 16,666 रुपयेच होतात. यातून आपण अंदाज घेऊ शकता की, जर तुम्हाला तुमच्या बचतीमधून प्रत्येक महिन्याला 50 हजार रुपये कमवायचे आहेत तर त्यासाठी 3 करोड रुपयांची एफडी करावी लागेल. आता तुम्हाला येथे इन्कम टॅक्सची सुद्धा चिंता असणार आहे. 3 करोड रुपयांवर 30 हजार वार्षिक टॅक्स असेल.
म्यूच्युअल फंड चांगले
परंतु, हायब्रिड म्यूच्युअल फंडच्या बाबतीत स्थिती वेगळी आहे. येथे तुम्ही तुमचे व्याज घेण्याच्या बदल्यात इन्व्हेस्टमेंटमधून कमाई करता. डिपॉजिटच्या शिवाय हा आणखी इन्कमचा मार्ग आहे. परंतु, हा वोलॅटाईल सुद्धा आहे. एक वर्षात हायब्रिड म्यूच्युअल फंडात रिटर्न कमी किंवा जास्त होऊ शकतो. परंतु, पाच वर्षांच्या कालाधीत तुम्हाला महागाई दर पार करून सहजपणे 6-7 टक्के लाभ होऊ शकतो. उदाहरणार्थ मागील पाच वर्षात बहुतांश इक्विटी फंड्सने 12-14 टक्के रिटर्न दिले आहे. एखाद्या वर्षात या रिटर्नमध्ये चढ-उतार होऊ शकतो.
प्रत्येक महिन्याला 50 हजार कमाविण्यासाठी 3 करोडची गरज नाही
अशा प्रकारच्या म्यूच्युअल फंड्समध्ये तुम्ही वार्षिक 4 टक्के पैसे काढू शकता. याशिवाय, यावर खुप कमी टॅक्स द्यावा लागतो. तुमच्या विड्रॉलवर कॅपिटल गेन्स टॅक्स द्यावा लागतो. जर तुम्ही 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुम्हाला 10 टक्के टॅक्स द्यावा लागेल. जर तुम्हाला 50 हजार रुपये प्रती महिना रेग्युलर इन्कम हवे असेल तर तुम्हाला 3 करोड रूपयांऐवजी 1.5 करोड ठेवावे लागतील. विशेष म्हणजे तुमचा रिटर्न कितीही झाला तरी, टॅक्स तर 10 टक्केच लागणार आहे.
असा वाचणार तुमचा टॅक्स
या टॅक्स लाभाचा आणखी एक फॅक्टर आहे. समजा तुम्ही 10 लाख रुपये म्यूच्युअल फंडमध्ये गुंतवले आहेत. एक वर्षानंतर ही रक्कम वाढून 10.80 लाख रुपये होईल. आता जर तुम्ही 80 हजार रुपये विड्रॉल केलेत तर तुमच्या एकुण होल्डिंग मध्ये 7.4 टक्क्यांचा लाभ झाला आहे आणि बाकी 92.6 टक्के तुमच्या द्वारे गुंतवलेली रक्कम आहे. आता तुम्ही कोणतीही रक्कम विड्रॉल केली तर टॅक्ससाठी रिटर्न आणि गुंतवणुकीच्या रक्कमेच्या प्रमाणात कॅलक्युलेट केले जाईल. अशा प्रकारे 80 हजार रुपये काढल्यास तुमचा लाभ केवळ 5,926 रुपये होतो आणि याच रक्कमेवर तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल.
एकुण विचार करता प्रत्येक दृष्टीकोनातून इक्विटी म्यूच्युअल फंडातून रेग्युलर विड्रॉल तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. विशेषता व्याजाच्या कमाईच्या दृष्टीने हा चांगला पर्याय आहे. रेग्युलर विड्रॉलसाठी सिस्टेमॅटिक विड्रॉल प्लान सुद्धा असतात. तुम्हाला एका गोष्टीकडे लक्ष द्यावे लागेल की, छोट्या कालावधीमध्ये हे वोलॅटाईल होते, म्हणजे बाजाराच्या जोखमीवर अवलंबून असते.
Visit : bahujannama.com