अकोला : बहुजननामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीकडून राज्यातील विधानसभा निवडणूकींसाठी कॉंग्रेसची वाट न पाहता आपली उमेदवार चाचपणी सुरु केली आहे. विदर्भात मागील तीन दिवसात वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या मतदारसंघांसाठी इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. यात एकट्या अकोला जिल्ह्यातील ५ मतदारसंघांसाठी एकूण १२३ इच्छुकांनी मुलाखती दिल्या.
वंचित बहुजन आघाडीने राज्यात लोकसभा निवडणूकीत आपले स्थान निर्माण केले. उमेदवार निवडून आले नसले तरी वंचितने राज्यात चांगली मतं मिळवली. त्याचा फटका कॉंग्रेस, राष्ट्रवादीला बसल्याची चर्चा राजकिय मंडळीत आहे. परंतु वंचित बहुजन आघाडीने आपले स्थान बळकट करण्याच्या दृष्टीने राज्यात सध्या रणनीती आखली आहे. त्यामुळे वंचितशिवाय पर्याय नाही हे समजलेल्या इच्छुकांनी उमेदवारीसाठी मुलाखती देण्यास गर्दी केली होती.
वंचितकच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्यांनी नागपूर, अमरावती आणि अकोला येथे मुलाखती घेतल्या. बोर्डाचे सदस्य अण्णाराव पाटील, प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर सुलताने, दीपक गवई यांच्या उपस्थितीत अकोल्यातील मुलाखती पार पडल्या. यावेळी वंचितची उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांची गर्दी झाली होती. १२३ जणांनी यावेली मुलाखती दिल्या.
विधानसभा मतदारसंघनिहाय मुलाखती देणारे
मतदारसंघ – उमेदवार
अकोला पुर्व – २६
मुर्तिजापूर – ४०
बाळापूर – ३०
अकोट – २२
अकोल पश्चिम – ०५