मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- बघायचं गेलं तर इंटरनेट जग देखील खूप मजेदार आहे. इथे लोकांना कोणतीही गोष्ट आश्चर्यचकित करते. नुकतेच इंटरनेट यूजर्स ट्विटरवर काजू चे फळ आणि त्याची शेती बघून आश्चर्यचकित झाले आहेत. जास्त तर लोकांना काजू खाण्याची आवड असते. परंतु त्याचे फळ प्रत्यक्षात कसे दिसते याविषयी लोकांना माहिती नसते. परंतु, ज्यांनी हे फळ बघितले आहे त्यांना धक्का बसला आहे. काजूचे फळ नेमके कसे असते. आज आपण काजू आणि त्याच्या शेती बाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
काजूची शेती या राज्यांमध्ये होते-
काजू बाबत अनेकांना संभ्रम असतील किंवा माहिती नसेल की काजू नेमके पिकतात तरी कसे जमिनीवरती येतात की जमिनीखाली असे अनेक प्रश्न असतील देशात काजूची शेती अनेक राज्यांमध्ये होते. ज्यात केरल,महाराष्ट्र,गोवा,कर्नाटक,तामिलनाडु,आंध्र प्रदेश,उड़ीसा या राज्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त झारखंड राज्याच्या काही भागांमध्ये सुद्धा शेती मोठ्या प्रमाणावर होते.
https://twitter.com/ColleenB123/status/1171960479322902529
ही झाडे सॉफ्ट वुड ग्राफ्टिंग पद्धतीद्वारे तयार केली जातात.-
काजूची रोपटी बनवण्यासाठी विशिष्ठ पद्धत वापरली जाते तीला सॉफ्ट वुड ग्राफ्टिंग विधि असे म्हणतात. काजूच्या झाडांना सुरुवातीला एक विशिष्ठ आकार देणे खूप गरजेचे असते. त्यासाठी काजूच्या झाडांना काटछाटही करावी लागते.
https://twitter.com/ColleenB123/status/1171960479322902529
सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे काजू मिळवण्यासाठी झाडाला लागलेले फळ पूर्ण तोडण्याची गरज नसते. फळातून पडलेले दाणे गोळा करून त्यांना सुकवून त्यावर विशिष्ठ प्रक्रिया करून त्यापासून काजू तयार होतात. प्रत्येक झाडापासून अंदाजे आठ किलो दाणे मिळतात.
https://twitter.com/ColleenB123/status/1171960479322902529
विशिष्ठ प्रक्रियेनंतर खाण्यालायक होतात काजू-
काजूचे फळ हे अगदी सफरचंदासारखे वाटते मात्र काजूच्या फळाला खालच्या भागात दाणे येतात आणि ते पडतात त्यानंतर त्यांच्यावर योग्य प्रक्रिया करून त्यांना खाण्यालायक केले जाते.
https://twitter.com/rananth/status/1172385609907752961