लखनऊ : वृत्तसंस्था – अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने विकास दुबेच्या संपत्तीची चौकशी सुरू केली आहे. ईडीने उत्तर प्रदेश पोलिसांकडून विकास दुबेच्या संपत्तीची यादी मागवली आहे. विकास दुबेच्या नावावर लखनऊमध्ये दोन मोठी घरे आहेत. आपला फायनान्सर आणि सर्वात निकटर्वीय विश्वासू जय वाजपेयीद्वारे विकास दुबेने आपल्या काळ्या कमाईचा हिस्सा दुबई आणि थायलंडमध्ये सुद्धा गुंतवला आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार नोटबंदीपूर्वी सुमारे 6.30 कोटी रूपयांची रोकड विकास दुबेने 2% व्याजावर लावली होती. जय वाजपेयीनेया 2% ला 5% सूटवर ते मार्केटमध्ये दिले आहेत. विकास दुबेची पत्नी रिचा दुबेकडे पोलिसांनी अनेक प्रकरणात चौकशी केली आहे आणि विशेषकरून नेते आणि व्यापार्यांसोबतच्या संबंधाबाबतही चौकशी केली आहे.
विकासच्या सहकार्यांची सुद्धा माहिती मागवली
याशिवाय, ईडीने, युपी पोलिसांकडून विकास दुबे, त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी त्याच्या सहकार्यांचीही माहिती मागितली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने विकास दुबेच्या विरूद्ध गुन्हेगारी प्रकरणांच्या सध्याच्या स्थितीची सुद्धा माहिती मागितली आहे.
जमीनदोस्त केले किल्ल्यासारखे घर
एन्काऊंटरपूर्वी कानपुरमध्ये स्थानिक प्रशासनाने विकास दुबेचे किल्ल्यासारखे घर जेसीबीने जमीनदोस्त केले. नंतर त्याच्या कार जेसीबीने चिरडून टाकण्यात आल्या. त्याचे लखनऊमध्ये सुद्धा एक घर आहे, आता तेसुद्धा पाडण्याची तयारी सुरू आहे.
कानपुर कांडातील आरोपी गँगस्टर विकास दुबे उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) सोबतच्या एन्काऊंटरमध्ये मारला गेला. युपी एसटीएफची गाडी विकास दुबेला मध्य प्रदेशच्या उज्जैनवरून कानपुरला आणत होती. कानपुरमध्ये एंट्री करण्यापूर्वीच कथितरित्या गाडी उलटली. यादरम्यान विकास दुबेने संधी साधून एसटीएफच्या एका जवानाची पिस्तूल हिसकावण्याचा प्रयत्न केला. यानंतर तो एन्काऊंटरमध्ये मारला गेला.
सध्या अंमलबजावणी संचालनालयाने विकास दुबेच्या संपत्तीची चौकशी सुरू केली आहे. संचालनालयाने विकास दुबेचा सहकार्याचीही माहिती युपी पोलिसांकडे मागितली आहे.