नवी दिल्ली : वृत्तसंस्था- जगभरात नोवेल कोरोना व्हायरसच्या परिणामामुळे १४ लोकांचा मृत्यू झाला असून भारत सरकारच्या आरोग्य विभागानेही याचे पुष्टीकरण केले आहे. या व्हायरसमध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये एक जण चीनचाही आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या म्हणण्यानुसार नोवेल कोरोना व्हायरस एनसीओव्हीचा आढावा घेण्यात येत आहे. आरोग्य मंत्रालयाने चीन, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता विमानतळांवर येणार्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांना थर्मल स्कॅनरद्वारे तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच यासंदर्भात विमानांमध्ये घोषणा केली असून चीनकडून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांसाठी आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर समुपदेशन उपलब्ध करून दिले आहे.
चीनमधील वुआन प्रांतात नोवेल कोरोना व्हायरसची नवे उदाहरण समोर आले असून ५ जानेवारी रोजी या व्हायरसमुळे एकाच मृत्यू झाला आहे. WHO च्यानुसार व्हायरस अजूनही विकसित होत असून हा व्हायरस सी-फूडशी जोडला गेला असल्याचे WHO च्या तपासणीतून समोर आले आहे. कोरोना व्हायरस हा विषाणूंच्या कुटुंबातील असून यामुळे लोकं आजारी पडत आहेत. उंट, मांजर आणि वटवाघूळ यांच्यासह इतरही प्राण्यांमध्ये हा व्हायरस प्रवेश करत असून काही वेळेला प्राणीसुद्धा माणसांना संक्रमित करू शकतात.
आरोग्य सचिव प्रीती सुदान या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचा आढावा घेत असून आरोग्य विभागाचं आदेशानुसार ८ आणि १५ जानेवारी रोजी आरोग्य सेवा महासंचालक डीजीएचएस यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त देखरेख समूहाची बैठक बोलवली होती.
Visit : Bahujannama facebook page –
- ‘अॅपल टी’चे हे 4 फायेद वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या ‘रेसिपी’
- संधिवाताची ‘ही’ आहेत 10 लक्षणे आणि 11 कारणे, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
- रंग आणि आरोग्याचे ‘कनेक्शन’ ! जाणून घ्या ‘या’ 10 रंगांचे तुमच्यावरील परिणाम
- ‘या’ 6 पद्धतीने करा तुमच्या आयुष्यातून तणावाला हद्दपार
- ‘विराट’ आणि ‘सेरेना’नेही केला होता फॉलो, ‘वेगन डाएट’चे हे 6 फायदे जाणून घ्या
- झोपल्यावर घाम येत असल्यास ‘या’ 9 कारणांचा विचार करा