बहुजननामा ऑनलाईन टीम – जर तुम्हाला कॉफीची (Caffeine) खुपच आवड असेल आणि दिवसात 4 कपपेक्षा जास्त पित असाल, तर तुम्हाला अगोदर आपल्या कुटुंबाच्या इतिहासात डोळ्यांच्या आजाराची माहिती घेतली पाहिजे.
Vinayak Mete | ‘आमचे आंदोलन मूक नसून बोलके असणार’, खा. संभाजीराजेंना टोला
माऊंट सिमाईमध्ये Icahn स्कूल ऑफ मेडिसिनने केलेल्या अंतरराष्ट्रीय बहु-केंद्र संशाधनातून समजले आहे की रोज कॅफीनचे (Caffeine) मोठ्या प्रमाणात सेवन केल्याने ग्लुकोमाची (Glaucoma) जोखीम तीनपट वाढते. ग्लुकोमामध्ये आहार-अनुवांशिकता यांचा संबंध दर्शवणारे हे पहिले संशोधन आहे.
नेत्र विज्ञानच्या (Ophthalmology) जून प्रिंट अंकात प्रकाशित संशोधनाच्या निष्कर्षात हा सल्ला दिला आहे की, ज्या लोकांच्या कौटुंबिक इतिहासात ग्लुकोमा आहे, त्यांनी कॅफीनचे Caffeine सेवन कमी केले पाहिजे. आयओपी (IOP) किंवा इंट्रा-ऑकुलर (Intra-ocular) प्रेशर डोळ्यांच्या आतील दबाव असतो. संशोधनात हे अगोदर सुद्धा सिद्ध झाले आहे की, उच्च आयओपी ग्लुकोमाच्या प्रगतीसाठी एक मजबूत कारक बनतो.
माऊंट सिनाई हॉस्पिटलच्या रिपोर्टनुसार, संशोधन महत्वाचे आहे, कारण ग्लुकोमा अमेरिकेत अंधळेपणाचे प्रमुख कारण आहे. तो ग्लुकोमावर कॅफीनच्या सेवनाचा प्रभाव दर्शवतो, आणि आयओपी जो डोळ्यांच्या आतील दबााव आहे. उच्च आयओपी ग्लुकोमासाठी एक मजबूत जोखीमचे कारण आहे. मात्र, याच्या पाठीमागे इतर कारणेसुद्धा योगदान देतात.
ग्लुकोमात रूग्ण सामान्यपणे तोपर्यंत सुरूवातीची लक्षणे अनुभवत नाहीत जोपर्यंत आजार पुढे जात नाही आणि डोळ्यांची दृष्टी कमजारे होऊ लागते.
Web Title : intake of high caffeine could increase risk of this blinding eye disease
केरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक बॅगेजमधून दुबईतून आणले होते ‘सोने’
भाड्याने दिलेली कार घेऊन तिघे फरार; मासिक भाड्याबरोबर गाडी गेली हातची