बहुजननामा ऑनलाइन टीम – तीर्थक्षेत्र जेजुरी शहरातील सहाय्यक(Inspector ) पोलीस निरीक्षक अंकुश माने यांची सोलापूर ग्रामीण येथे बदली झाली आहे . या रिक्त पदाचा पदभार पोलीस निरीक्षक सुनील महाडिक घेतला आहे . पोलीस निरीक्षक सुनील महाडिक हे कृषी पदवीधर असून १९९७ ते २००४ याकाळात त्यांनी मुंबई येथे पोलीस उपनिरीक्षक(Inspector ),तसेच सांगली, नागपूर, पुणे, दौंड येथे पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे . 23 वर्षे पोलीस खात्यात उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना आत्तापर्यंत पाचशे रिवार्ड मिळाले आहेत. २०१८ साली पोलीस खात्यातील निष्कलंक व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानीय करण्यात आले आहे .