इंदूर न्यूज : बहुजननामा ऑनलाइन – Indore police | इंदूर पोलिसांची अधिकृत वेबसाईट सायबर(Website Cyber) चोरट्यांनी हॅक (hacked) करुन शहरात बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे इंदूर शहर(city indore) व परिसरातील जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट(red alart) जारी करण्यात आला असून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
Indore police website hacked; Red alert in city over bomb threat
याबाबत इंदूरचे पोलीस महानिरीक्षक हरिनारायणचारी मिश्रा (Indore police website hacked) यांनी सांगितले की, इंदूर पोलिसांची वेबसाईट हॅक सायबर चोरट्यांनी हॅक केली होती. ती त्वरीत रोखली गेली आहे. आरोपींना लवकरच पकडू. दरम्यान बॉम्बच्या धमकीमुळे सुरक्षेविषयक खबरदारी म्हणून इंदूर व जवळच्या जिल्ह्यात अलर्ट देण्यात आला आहे. शहरात साध्या वेशातील पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. बॉम्बशोधक व नाशक पथके(Bomb Squad) तैनात करण्यात आली आहेत.
उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथका(Uttar Pradesh Anti-Terrorism Squad)ने रविवारी लखनौमध्ये अल कायदाच्या दहशतवाद्यांचा कट उद्धवस्त केल्यानंतर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा(Madhya Pradesh Home Minister Narottam Mishra) यांनी मध्य प्रदेशात रेड अलर्ट जारी केला होता.
Web Title : Indore police website hacked; Red alert in city over bomb threat.
Chandrapur News | बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार; घरात शिरुन महिलेवर केला हल्ला
Pune Crime | खंडणी न दिल्याने बिल्डरवर गोळीबार करणाऱ्या 4 जणांवर ‘मोक्का’