इंदौर : वृतसंस्था – भारतीय जनता पक्षाचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांचा मुलगा व भाजप आमदार आकाश विजयवर्गीयने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला बॅटने मारहाण केली आहे. ही घटना मध्यप्रदेशमधील इंदौर येथे घडली. इंदौर महानगरपालिकेचा अधिकारी अतिक्रमण रोखण्यासाठी एक धोकादायक घर तोडण्याची कारवाई करत होता
#WATCH Madhya Pradesh: Akash Vijayvargiya, BJP MLA and son of senior BJP leader Kailash Vijayvargiya, thrashes a Municipal Corporation officer with a cricket bat, in Indore. The officers were in the area for an anti-encroachment drive. pic.twitter.com/AG4MfP6xu0
— ANI (@ANI) June 26, 2019
व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, आकाश विजयवर्गीय अत्यंत निर्दयपणे त्या अधिकाऱ्याला बॅटने मारहाण करत आहे. मध्यप्रदेशचे गृहमंत्री बाला बच्चन यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, कोणी कितीही मोठा नेता असो, कायदा हातात घेतल्यास कायदा त्याचे काम करेल.
आमदार आकाश विजयवर्गीय म्हणाले की, ही फक्त सुरवात आहे. आम्ही या भ्रष्टाचार आणि गुंडगिरीला नष्ट केले आहे. अर्ज, निवेदन नाहीतर दन दना दन हे आमचे पाऊल आहे. त्यांनी महिलांना खेचून घराबाहेर काढले. त्यांच्या जवळ महिला पोलीस असायला पाहिजे. मी जेव्हा तिथे पोहचलो तेव्हा तेथील लोक अधिकाऱ्यावर चिडले होते. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहोत.
आमदार आकाश विजय वर्गीय आणि मनपा अधिकारी धीरेंद्र बायस यांच्यातील वाद इतका वाढला की धीरेंद्र बायस यांना पळवून पळवून मारण्यात आले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडूनही धीरेंद्र यांना मारहाण करण्यात आली. पोलीस अधीक्षक रुची वर्धन यांनी सांगितले की, आकाश विजयवर्गीय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसने या घटनेचा निषेध करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.