वॉशिंग्टन / नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प नेहमी आपल्या वक्तव्यांमुळे प्रसिद्धीच्या झोतात असतात. अनेकदा त्यांची वक्तव्य त्यांना जागतिक स्थितीचा अंदाज नसल्याचे दर्शवतात. असाच एक खुलासा एका पुस्तकातून झाला आहे. अमेरिकतील वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टच्या दोन पत्रकरांनी आपल्या पुस्तकात अशाच प्रकारचा दावा केला आहे. हा दावा अमेरिकेच्या राष्ट्रपतींकडून भारत आणि चीनच्या संबंधांवर केलेल्या टिपण्णीशी संबंधित आहे.
या पुस्तकात दावा करण्यात आला आहे की, ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं सोबतच्या एका बैठकीत म्हटले होते की, भारताची सीमा चीनला लागून नाही. पुस्तकात असा दावा करण्यात आला आहे की ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर मोदी यांना धक्का बसल्याचे दिसत होते. फिलिप रकर आणि कॅरोल लिओनिंग यांच्या पुस्तकात दावा करण्यात आला आहे की, मोदींवरील हा घाव हळूहळू चिंतेत बदलला होता.
ट्रम्प यांच्या सहकार्याने सांगितले की, मोदी यांनी ही बैठक सोडली होती. ट्रम्प यांच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, ट्रम्प एक गंभीर राजकीय नेते नाहीत, मी या व्यक्तीला एक सहकारी समजू शकत नाही, असे हावभाव यावेळी मोदींच्या चेहर्यावर होते.
Visit : bahujannama.com