नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये करोना विषाणूमुळे मृतांची संख्या ६१८ वर पोहोचली असून त्यातच आता ६९ लोकांचा मृत्यू झाला आहे. जगातील बरेच वैज्ञानिक या विषाणूपासून बचाव करण्यासाठी एकत्र जमले असून आता या प्रयत्नांमध्ये ऑस्ट्रेलियातून उमेद जागवणारी बातमी आहे. ऑस्ट्रेलियात भारतीयस्तिथ नेतृत्वात या व्हायरसची लस बनवण्याच्या जवळ असल्याचा दावा केला असून ऑस्ट्रेलियामधील कॉमनवेल्थ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशनच्या (CSIRO) उच्च-सुरक्षा लॅबमध्ये संशोधन करण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध आहे.
ऑस्ट्रेलियातील डॉर्टी इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी गेल्या आठवड्यात एखाद्या व्यक्तीच्या नमुन्यातून मिळालेल्या विषाणूला वेगळे ठेवण्यात यश मिळवले होते. CSIRO मधील विषाणूची वाढ बघता विचार करता पूर्व-क्लिनिकल अभ्यासासाठी मोठ्या संख्येने गरज असल्याचा अंदाज आहे.
CSIRO डॅंगस पॅथोजेन संघाचे नेतृत्व करणारे प्राध्यापक एस.एस. वासन यांनी ‘आम्ही डॉर्टी इन्स्टिट्यूटच्या आमच्या सहकाऱ्यांचे आभारी आहोत, ज्यांनी वेगळ्या केलेल्या विषाणूला सामायिक केले. रियाल व्हायरससह काम वेगाने होते आणि पूर्व-क्लिनिकल अभ्यासामुळे औषधे लवकर तयार करण्यात मदत होते,’ असे म्हटले आहे. पुढे ते म्हणाले की, ‘ऑस्ट्रेलियन अॅनिमल हेल्थ लॅबमधील माझे सहकारीही डायग्नोस्टिक सर्व्हिलान्स आणि रिस्पॉन्सवर काम करत आहेत. CSIRO चा दुसरा भाग (मॅन्युफॅक्चरिंग) क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीतर्फे लस प्रतिजन वाढविण्यासाठी पाठिंबा देत आहे.’