नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हिर्याचे दागिने घालणे सर्वांनाच आवडते. साखरपुड्याच्या आंगठीपासून गळ्यातील हिर्याच्या सौंदर्यात हिरे भर टाकतात. जरा विचार करा तुमची आवडती हिर्यांची अंगठी अशी असेल ज्यामध्ये जगातील सर्वाधिक हिरे लावलेले असतील, तर तुमची काय स्थिती असेल. होय, एका इंडियन ज्वेलरी डिझायनरने अशीच एक अंगठी तयार करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. सोशल मीडियावर या शानदार डायमंड रिंगचे फोटो मोठ्याप्रमाणात वायरल होत आहेत.
25 वर्षांचा ज्वेलरी डिझायनर हरीश बन्सलने एक खुप आश्चर्यकारक काम करून दाखवले आहे, ज्यामुळे आज संपूर्ण जगात त्याचे आणि आपल्या देशाचे नाव घेतले जात आहे. त्याने एक अद्भुत डायमंड रिंग बनवली आहे, ज्यामध्ये 12,638 हिरे लावलेले आहेत. तिचे नाव ‘द मेरीगोल्ड – रिंग ऑफ प्रॉस्पेरिटी’ ठेवले आहे. ही अंगठी खुपच सुंदर आहे. तिचे वजन 165 ग्रॅम आहे. अंगठीत सर्वात जास्त हिरे लावून हरीश बन्सलने वर्ल्ड रेकॉर्ड तोडला आहे आणि त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले गेले आहे.
8 लेयरच्या या किमती अंगठीला फुलाचा आकार दिला आहे. अंगठीत 12,638 हिरे आहेत. परंतु, सध्या ही अंगठी विकण्याचा हरीशचा कोणताही प्लॅन नाही. यापूर्वी सर्वात जास्त हिरे लावलेली अंगठी बनवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड इंडियन व्यक्तीच्याच नावावर होता. हैद्राबादमध्ये चंदूभाई नावाचे डायमंड स्टोअरचे कोट्टी श्रीकांत यांनी 7801 हिरे लावलेली अद्भुत डायमंड रिंग बनवली होती. ही अंगठी 58 ग्रॅम सोन्यात बनवली होती, जिची किंमत 4,116,787 डॉलर आहे.