वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. भारतात कोरोनाचा सुरु असलेल्या थैमानामुळे जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. भारतात वाढत असलेल्या कोरोना थैमानामुळे जगभरात चिंतेचे वातावरण असून आंतरराष्ट्रीय समुदायाचे भारताकडे लक्ष आहे.
अमेरिकेतील प्रतिष्ठित ‘टाइम’ पाक्षिकाने आपल्या मुखपृष्ठावर भारतातील कोरोना संकटाच्या भीषणेतवर भाष्य करणारे छायाचित्र प्रकाशित केले आहे. ‘भारत संकटात’ या माथळ्याखाली स्मशान भूमीतील छायाचित्र टाइमने प्रकाशित केले आहे.
भारतातील कोरोना परिस्थितीवर आंतरराष्ट्रीय माध्यमांनी भाष्य केले आहे. भारतात कोरोनाचे संकट गंभीर होणार असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिला आहे. ‘टाइम’साठी नैना बजेकल यांनी कव्हर स्टोरी लिहिली आहे. बजेकल यांनी म्हटले आहे की, भारतातील आरोग्य व्यवस्था कोलमडण्याच्या परिस्थितीत आहे. देशात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि रुग्णांसाठीच्या खाटांची कमतरता आहे. भारतातील लोक रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा शोध घेण्यासाठी धवपळ करत आहेत. मागणी अधिक असल्याने औषध चढ्या दराने खरेदी करावे लागत आहेत. तर वाढत्या कोरोना चाचणींमुळे प्रयोगशाळांवर ताण वाढला आहे. हे कोरोना संकट केवळ भारतातील 1.4 अब्ज लोकांसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी भयावह असणार असल्याचे टाइमने म्हटले आहे.
A health system on the brink of collapse. Thousands dying every day. I wrote for @TIME on how India is now facing the world’s worst COVID-19 outbreak—and why it really didn’t need to be this way. Powerful cover image by @saumyaphotos https://t.co/OUJ32bRYUB pic.twitter.com/lMe2yLkVdR
— Naina Bajekal (@naina_bajekal) April 29, 2021
भारतात कोरोनाची परिस्थिची चिंताजनक बनत चालली आहे. जगभरातून भारताला मदतीचा ओघ सुरु झाला आहे. भारतीय हवाई दलाने गुरुवारी बँकॉक, सिंगापूर आणि दुबईतून 12 रिकामे क्रायोजेनिक ऑक्सिजन कंटेनर भारतात आणले. थायलंड व सिंगापूरमधून प्रत्येकी तीन आणि दुबईमधून सहा कंटेनर हवाई दलाने भारतात आणले आहेत. हे कंटेनकर देशातील विविध शहरातील ऑक्सिजन फिलिंग स्टेशनवर पोहचवण्यात येणार आहेत. याशिवाय अमेरिका, ब्रिटन इत्यादी देशांमधून ऑक्सिजन कॉन्स्ट्रेर्सही भारतात दाखल झाले आहेत.