नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकेने गुरुवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला ( RBI) बँकेच्या तीन फसव्या खात्यांविषयी माहिती दिली. एवढेच नव्हे तर या तिन्ही खात्यांत एकूण 35 कोटींपेक्षा जास्त रक्कम थकबाकी असल्याचेही सांगितले. शेअर बाजाराला पाठवलेल्या माहितीत बँकेने या खात्यांना फसवे खाते असल्याचे म्हणत, भारतीय रिझर्व्ह बँकेला नियामक आवश्यकतानुसार माहिती देण्यात आली आहे.
इंडियन बँकेने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हंटले कि, त्याने एस- कुमार्स नॅशनवाइड लिमिटेड, प्रिया लिमिटेड आणि युवराज पॉवर प्रोजेक्ट्स अशी नॉन-परफॉर्मिंग अॅसेट्स (एनपीए ) असलेली तीन खाती फसवी असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. नियामक आवश्यकतानुसार त्यांनी ही माहिती रिझर्व्ह बँकेला दिली आहे. या तिन्ही खात्यात एकूण 35.29 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आल्याचे बँकेने म्हटले आहे. ज्यात एस-कुमार्स नॅशनवाइड लिमिटेडची 14.51 कोटी, प्रिया लिमिटेडची 9.73 कोटी आणि युवराज पॉवर प्रोजेक्ट्सवर 11.05 कोटीची थकबाकी असल्याचे बँकेने म्हटले आहे. पहिल्या दोन खात्यांमध्ये 100 टक्के कर्जाची तरतूद आहे, तर तिसर्या खात्यात डिसेंबर 2020 अखेर 9.60 कोटी रुपयांची तरतूद असल्याचे समजते.
काय आहे NPA ?
नॉन परफॉर्मिंग अॅसेट्स (एनपीए) ही अशी कर्ज आहेत जी सुरुवातीला बँकांनी त्यांच्या ग्राहकांना दिली होती, परंतु थोड्या कालावधीनंतर ही कर्ज परत येणे थांबले. ज्यामुळे बँकांचे उत्पन्न राखडते आणि त्यांच्याद्वारे दिले गेलेले कर्जही धोक्यात येते. जर मूलभूत देय 91 दिवसांपेक्षा जास्त काळ रोखले गेले असेल आणि व्याज देय 365 दिवसांपेक्षा जास्त असेल तर कर्ज नॉन-परफॉर्मिंग अॅसेट्स (एनपीए) होते.