काश्मीर : वृत्तसंस्था – भारतीय हद्दीत घुसखोरीसाठी दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून मदत केल्यानंतर भारतीय लष्करानं प्रत्युत्तरादाखल मोठी कारवाई करत पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अनेक तळ उध्दवस्त केले आहेत. भारतीय सैन्यानं केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे 4-5 सैनिक ठार झाले आहेत याबाबतची माहिती लष्करातील सुत्रांनी दिली आहे.
Sources: As per reports, 4-5 Pakistan Army soldiers have been killed and several have been injured. Indian Army has launched attacks on terrorist camps situated inside Pakistan occupied Kashmir (PoK) opposite the Tangdhar sector. pic.twitter.com/SFFFjAReHX
— ANI (@ANI) October 20, 2019
शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानकडून फायरिंग करण्यात आलं होते. त्यामध्ये 2 भारतीय जवान शहीद झाले होते तर एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून आज भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी कारवाई केली. त्यामध्ये 4-5 पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत .भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करताना केलेल्या कारवाईत आर्टिलरी बंदूकीचा वापर केला आहे. भारतात घुसखोरीसाठी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्करानं ही कारवाई करून मोठा दणका दिला आहे.
Visit : bahujannama.com