नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा भारताचा निर्णय ! लाज राखण्यासाठी विजय आवश्यक
कॅनबेरा : सिडनीतील दोन्हीही एकदिवसीय सामन्यात एकतर्फी पराभवानंतर आता तिसरा व अखेरच्या सामन्यात लाज राखण्यासाठी भारताला विजय आवश्यक आहे. आज सकाळी नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पहिल्या दोन्ही सामन्यात ऑस्टेलियाने उभारलेल्या पावणे चारशेहून अधिक धावांचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी कोसळली होती. एका बाजूला गोलंदाज ऑस्टेलियाला रोखण्यात अपयशी ठरले असताना फलंदाजही फारशी चमकदार कामगिरी करु शकले नाहीत. त्यात विराट कोहलीच्या अपयशामुळे पहिल्या दोन्ही सामन्यात भारत कधीही ही लढत जिंकू शकेल, असे चिन्ह संपूर्ण सामन्यादरम्यान दिसून आले नाही.
मात्र, तिसर्या सामन्यात नाणेफेकीचा निर्णय भारतासाठी अनुकुल ठरला असून भारताने प्रथम फलदांजीचा निर्णय घेतला आहे. आज धावांच्या पाठलाग करण्याचे दडपण नसल्याने भारतीय फलदांज दडपणाशिवाय चांगली फलंदाजी करुन धावांचा डोंगर उभारणार का याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.