बहुजननामा ऑनलाईन टीम – आज भारतीय संघ टी – २० मालिकेतील पहिला टी – २० सामना खेळणार आहे. हा सामना विंडीज संघाच्या विरुद्ध असणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने जोरदार तयारी केलेली आहे. पण सामन्याच्या आधीच भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आहे. विंडीजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल हा दुखापतीमुळे पहिल्या २ सामन्यातून बाहेर आहे.
सध्या भारतीय संघ विंडीजच्या दौऱ्यावर आहे. आज टी – २० मालिकेतील पहिला टी – २० सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने जोरदार तयारी केली आहे. तर विंडीजने देखील जय्यत तयारी केली आहे. मात्र सामन्याआधी भारतीय संघासाठी चंगली बातमी आहे तर विंडीजसाठी चिंतेची गोष्ट आहे. कारण विंडीजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल हा दुखापतीमुळे पहिल्या २ सामन्यातून बाहेर आहे. आंद्रे रसेलच्या जागी विंडीजने जेसन मोहम्मद या खेळाडूला संधी दिली आहे. त्याने संघासाठी नऊ टी -२० सामने खेळले असून संघाचे नेतृत्व देखील केले आहे. सध्या कॅनडामध्ये सुरु असलेल्या ग्लोबल टी – २० लीगमध्ये त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने निवड समितीला याविषयी माहिती दिली. त्यानंतर निवड समितीने जेसन मोहम्मदाचा समावेश केला आहे. त्याने याआधी त्रिनिदाद एंड टोबॅगो आणि अमेझॉन वॉरियर्स यासाठी देखील खेळला आहे.
दरम्यान, या टी – २० सामन्यानंतर भारतीय संघ हे ३ एकदिवसीय सामने आणि २ कसोटी सामने देखील खेळणार आहे. त्यामुळे रसेल लवकर बरा व्हावा अशी अपेक्षा निवड समितीने व्यक्त केले.