नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसाला लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता जगातील सर्वाधिक करोना बाधित रुग्णांची संख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत तिसर्या स्थानी पोहोचला आहे. भारताच्या आधी रशिया तिसर्या स्थानी होता. या यादीत पहिल्या क्रमांकावर अमेरिका असून, दुसर्या स्थानी ब्राझील आहे
सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांच्या यादीत भारत तिसर्या स्थानावर पोहोचला आहे. भारत रशियाला मागे टाकत तिसर्या स्थानावर पोहोचला आहे. भारतातील रुग्णांची संख्या वाढून 6 लाख 90 हजार 396 इतकी झाली. तर जॉन हॉपकिंन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार रशियातील बाधित रुग्णांची संख्या 6 लाख 80 हजार 282 इतकी झाली आहे.
सध्या अमेरिका 28 लाख 44 हजार रुग्णसंख्येसह पहिल्या स्थानावर असून, ब्राझील 15 लाखा 77 हजार रुग्णांसह दुसर्या क्रमांकावर आहे. अमेरिका व ब्राझीलमधील बाधिताच्या रुग्णसंख्येत मोठे अंतर असले, तरी गेल्या काही दिवसांपासून देशातील बाधिता रुग्ण आढळून येण्याच प्रमाण लक्षणीय वाढले आहे. जून महिन्याच्या अखेरच्या 12 दिवसातच देशात 2 लाख रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आकडेवारीमुळे भारताच्या चिंतेत भर टाकली आहे.