नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय पोस्ट विभागात दहावी पाससाठी भरती होणार आहे. इंडिया पोस्टने तेलंगणा, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश सर्कलच्या ग्रामीण डाक सेवकांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या तीन राज्यांसाठी एकूण ५४७६ जागा रिक्त आहेत. आंध्र प्रदेश सर्कलमध्ये २७०७, छत्तीसगड सर्कलमध्ये १७९९ आणि तेलंगणामध्ये ९७० आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. २२ऑक्टोबरपासून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होईल. ऑनलाईन अर्ज करण्याची आणि फी भरण्याची शेवटची तारीख १४ नोव्हेंबर २०१९ आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. या भरतीद्वारे ब्रांच पोस्ट मास्टर (बीपीएम), असिस्टेंट ब्रांच पोस्टमास्टर (एबीपीएम) आणि डाक सेवक भरती होणार आहेत.
पात्रता
या भरतीसाठी दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात. दहावीत इयत्ता गणिताचे आणि इंग्रजीचे शिक्षण घेणे अनिवार्य आहे. या व्यतिरिक्त आपण ज्या मंडळामध्ये अर्ज करीत आहात त्या स्थानिक भाषेचे ज्ञान असणे देखील अनिवार्य आहे.
वयोमर्यादा
कमीत-कमी वयोमर्यादा – १८ वर्षे
जास्तीत-जास्त वयोमर्यादा – ४० वर्षे
सरकारी नियमांनुसार वयाची सूट देण्यात येईल.
निवड प्रक्रिया
परीक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे होईल. जर उमेदवाराची उच्च पात्रता असेल तर काही फरक पडणार नाही. केवळ निवड दहावीच्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी indiapost.gov.in किंवा appost.in/gdsonline व या वेबसाइटवर जाऊन अर्ज भरू शकतात.
Visit : bahujannama.com