बीजिंग : ‘पुढील बौद्ध धर्मातील सर्वाच्च धर्मगुरु म्हणजे दलाई लामा. सध्याच्या दलाई लामा नंतर पुढील दलाई लामा चीनमधून निवडण्याची शक्यता आहे. मात्र या निवडीमध्ये भारताने हस्तक्षेप करु नये, असा इशारा चीनकडून देण्यात आला आहे. तिबेटमधील उपमंत्री वँग नेंग शेंग यांनी ल्हासा येथे पत्रकारांशी बोलताना हा इशारा दिला.
सध्याच्या दलाई लामा हे तिबेटचे असून ते भारतात आश्रयाला आहेत. त्यांचा चीन सरकारला विरोध देखील आहे. तिबेटवर चीन अतिक्रमण करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे भारत व चीन यांच्यामध्ये दलाई लामांच्या मुद्दावरुन मतभेद असल्याची शक्यता आहे. मात्र या मुद्यावर पहिल्यांदाच चीनने उघड भुमिका घेतली आहे. दलाई लामांच्या निवडीबाबद दोनशे वर्षांपासून सुरू असणाऱ्या या धार्मिक बाबीमध्ये चीनची परवानगी आवश्यक बनली आहे.
वँग म्हणाले, ‘ सध्याच्या दलाई लामा यांना चीनची मान्यता आहे. मात्र नव्या दलाई लामाची निवड ही ऐतिहासिक, धार्मिक आणि राजकीय मुद्दा आहे. दुसऱ्या देशातील एखादा छोटासा त्यांच्या निवडीविषयी ठरवू शकत नाही.’ सध्याचे दलाई लामा हे ८४ वर्षांचे असून त्यांच्या पुढील वारस कोण असेल याकडे सर्व बौद्ध धर्मीयांचे लक्ष लागले आहे.
नव्या दलाई लामाची निवडी अगदी लहान वयातच करण्यात येते. त्यानंतर त्याला बौद्ध धर्माचे शिक्षण देण्यात येते. दलाई लामा बौद्ध धर्माचे सर्वाच्च गुरु असल्याने जगभर पसरलेल्या बौद्ध धर्मियांमध्ये वंदनीय असतात.