नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय हवामान खात्याने जाहीर केलेल्या ताज्या अंदाजानुसार यावर्षी उन्हाळ्यात तापमान सामान्यपेक्षा जास्त असेल. हवामान खात्याच्या माहितीनुसार, यावर्षी मार्च ते मे या कालावधीत हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम राजस्थान आणि अरुणाचल प्रदेशातील सरासरी कमाल तापमान सामान्यपेक्षा एक डिग्री सेल्सिअस राहील. त्याच वेळी, जम्मू-काश्मीर, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली येथे सरासरी कमाल तापमान उन्हाळ्यात 0.5-1 डिग्री सेल्सियस पर्यंत असू शकते.
यावर्षी जगभरात तापमानात वाढ होऊ शकते. यावर्षी उष्णता अधिक असेल आणि पुढील पाच वर्षे हा असाच उन्हाळा राहण्याची माहिती ब्रिटनच्या हवामान खात्याने व्यक्त केली आहे. असे म्हटले जाते की सन 2020 ते 2024 या काळात दर वर्षी तापमान 1.06 डिग्री ते 1.62 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढू शकते. सन 2015 ते 2019 दरम्यान तापमानात 1.09 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. या दरम्यान 2016 हे वर्ष आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष ठरले होते.
Press Release on Seasonal Outlook for the Temperatures during March to May, 2020 :
The March-April-May (MAM) season average temperatures are likely to warmer than normal over most of the meteorological subdivisions of northwest, west and central India and 1/3@rajeevan61 pic.twitter.com/F724JXcHKc
— India Meteorological Department (@Indiametdept) February 27, 2020
भारतीय हवामानशास्त्र विभाग दरवर्षी उन्हाळा आणि हिवाळ्यासंबंधी अंदाज जारी करतो. आता दुसरा अंदाज एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होईल. यानंतर पावसाळ्याचा अंदाज मेच्या सुरूवातीला जाहीर होईल. विज्ञान मंत्रालयाच्या मान्सून मिशन प्रकल्पातील मान्सून मिशन कपल्ड फोरकॉस्टिंग सिस्टम (एमएमसीएफएस) वर हा अंदाज आधारित आहे.
ताज्या अहवालानुसार मार्च, एप्रिल आणि मे दरम्यान, वायव्य, पश्चिम आणि मध्य भारत आणि काही भागांत तापमान किंचित जास्त असू शकते. राजधानी दिल्लीत उन्हाळ्यात वाढ होणार आहे. किमान आणि जास्तीत जास्त तापमान वाढेल. असा अंदाज आहे की यावर्षी मे-जूनमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते.