बहुजननामा ऑनलाईन टीम – भारतीय सैनिकांबरोबर काश्मीरमध्ये लष्कराबरोबर काम करण्याचा निर्णय सध्या भारताचा माजी कर्णधार आणि खेळाडू महेंद्रसिंग धोनी यांनी घेतला आहे. धोनीने आता क्रिकेटमधून दोन महिन्यांसाठी विश्रांती घेतला असून या कालावधीत तो भारतीय सैनिकांबरोबर काम करणार आहे. सध्या धोनी काश्मीर खोऱ्यात पहारा देण्याचे काम करत असून मागील महिन्यातच त्यांनी १०६ TA या बटालियनमध्ये रुजू झाला आहे. लष्कराची सेवा करत सध्या धोनी १५ ऑगस्टपर्यंत तिथे राहणार आहे.
या दरम्यान त्याला झेंडावंदन करण्याची संधी लडाखमध्ये मिळण्याची शक्यता आहे. सध्या धोनीने दोन महिन्यांसाठी क्रिकेट मधून विश्रांती घेतली असून या काळात तो लष्कराची सेवा करत आहे. याविषयी लष्करच्या एका अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले की, धोनी हा भारतीय सैन्याचा ब्रँड अँबेसिडर असून तो भारतीय सैन्यासाठी प्रेरणा आहे. तसेच तो आपल्या युनिटमधील सैनिकांना देखील प्रेरित करत आहे. म्हणून धोनीला हा मन मिळण्याची शक्यता आहे. धोनी लष्करात असून अनेकदा सैनिकांबरोबर व्हॉलीबॉल खेळतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. ५० ते ६० सैनिकांबरोबर धोनी सध्या या ठिकाणी राहत आहे. याठिकाणी धोनी पेट्रोलिंग गार्ड त्याचबरोबर पोस्ट ड्युटी देखील करत आहे. .
याआधीही अनेक खेळाडू सैन्यात होते
अनेक खेळाडूंनी धोनीच्या आधी लष्करात सेवा बजावली होती. यात भारतीय संघाचे पहिले कर्णधार कर्नल सी. के. नायडू हे देखील १९२३ मध्ये सैन्यात होते. त्यांना कर्नलचे पद देण्यात आले होते. तसेच लेफ्टनंट हेमू अधिकारी यांनी देखील आधी लष्करात सेवा बजावली आहे. धोनी याठिकाणी १५ ऑगस्ट पर्यंत राहणार आहे. कित्येक दिवसांपासून धोनी निवृत्ती होण्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र धोनी हा पुढील वर्षी होणाऱ्या टी – २० वर्ल्डकपपर्यंत खेळणार असून त्यानंतर तो निवृत्त होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.