नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरंक्षण दलाच्या बाबत आज लाल किल्ल्यावरुन राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. पायदल, हवाई दल आणि नौदल या तिन्ही संरक्षण दलातील समन्वयासाठी ‘चीफ आॅफ डिफेन्स स्टाफ’ हे नवे पद निर्माण करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी लाल किल्ल्यावरुन केली.
यापूर्वी पायदलाचा प्रमुखांना लष्कर प्रमुख असे संबोधून त्याला लष्कराचे प्रमुख मानले जात असे. मात्र, ते तिन्ही दलाच्या प्रमुखांचे पद सम पातळीवर आहे. त्यामुळे कोणी कोणाला आदेश द्यायचा याबाबत नेहमीच शाशंकता निर्माण होत असे. या तिन्ही सरंक्षण दलातील समन्वयाबाबत अनेकदा अडचणी येत असे. पायदल, हवाई दल आणि नौदल यांच्यामध्ये एकमेकांना सहकार्य आणि समन्वय यांचा अभाव अनेकदा दिसून येत असे. यापुढील काळात दोन देशांमधील सीमेवर प्रत्यक्षात लढाईचे प्रसंग कमी येतील. पण सायबर क्राईमद्वारे युद्ध छेडले जाईल. त्याला प्रतिकार करण्यासाठी सक्षम सुरक्षा व्यवस्थेची आवश्यकता निर्माण झाली आहे.
PM Modi: Our security forces are our pride. To further enhance coordination between our forces, I announce a big decision today,India will now have a Chief of Defence Staff- CDS. This is going to make the forces even more strong pic.twitter.com/sLH3wnuyrp
— ANI (@ANI) August 15, 2019
अशाच वेगवेगळ्या कारवायासाठी तिन्ही दलाचे समन्वय अधिकाधिक असणे जरुरीचे वाटू लागले होते. त्यासाठी या तिन्ही दलातील समन्वयासाठी ‘चीफ आॅफ डिफेन्स स्टाफ’ हे नवे पद निर्माण करण्यात येणार आहे. या तिन्ही सुरक्षा दलाच्या प्रमुखांच्या वर हे पद असणार आहे. भारताबरोबरच बांगला देश आणि अफगाणिस्तान हे दहशतवादाविरुद्ध लढा देत आहे. आता अतिरेक्यांना आश्रय देणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले.