इंदापूर : बहुजननामा ऑनलाइन – निमगाव केतकी (ता.इंदापूर) हद्दीत एका शेतात भाड्याचे पत्र्याचे शेडमध्ये बनावट व विषारी दारू तयार करून त्यावर नामांकीत कंपण्याचे खोटे लेबल लावुन विषारी दारू बनविण्याचा उद्योग सुरू असताना इंदापूर पोलीसांनी कारवाई केली करत दोन जणांवर गुन्हा दाखल केला असुन ३६ हजार ८२० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.तर दोनही आरोपी फरार असल्याची माहीती इंदापूर पोलीसांनी दीली आहे.
विजय आनंद घाडगे.रा.गलांडवाडी नं.१, ता.इंदापूर, जि.पूणे व आसीफ रमजान तांबोळी रा.इंदापूर, जि.पूणे अशी बनावट दारू बनविणार्या आरोपींची नावे असुन पो.काँ. दत्तात्रय रामचंद्र अर्जुन, इंदापूर पोलीस स्टेशन यांनी याबाबतची फिर्याद इंदापूर पोलीसात दीली असुन फिर्यादीत म्हटले आहे की मौजे निमगाव केतकी गावचे हद्दीत रामकुंड येथील सदाशिव गोविंद काळे यांचे शेतात पत्र्याचे शेड भाड्याने घेवुन त्यामध्ये वरील दोन आरोपी हे बनावट दारू तयार करून त्यावर खोटे देशी दारू, टँगो पंच नावाचे खोटे लेबल लावुन विषारी व बनावट दारू तयार करून विक्री करून फसवणुक करत असल्याची गुप्त माहीती इंदापूर पोलीसांना मीळाली होती.
सहाय्यक पोलीस निरिक्षक बीरापा लातुरे यांनी पोलीस पथकासह सदर ठीकाणी छापा टाकला असता दारूच्या बाटल्यांच्या टोपनांना शिल करण्याचे ३५ हजार रूपये किमतीचे एक मशीन, व देशी दारू,टँगो पंच नावाचे लेबल असलेल्या ३५ बाटल्या, मोकळ्या काचेच्या २० बाटल्या, टँगो लिहीलेले १८० टोपण, देशी दारू टँगो पंच नावाचे १५० स्टीकर, एक निळ्या रंगाचे कँड, फेव्ही काॅलच्या चार बाटल्या असा १८२० रूपयाच्या मुद्दे मालासह एकुण ३६ हजार ८२० रूपयाचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला असुन दोन जणावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी फरार असल्याची माहीती इंदापूर पोलीसांनी दीली आहे. तर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक बीरापा लातुरे हे करत आहेत..