इंदापूर :बहुजननामा ऑनलाईन – Indapur News | इंदापूर शहर मुख्य बाजारपेठेतील गजबजलेल्या ठिकाणच्या चप्पल दुकानात बुरखाधारी चार ते पाच महिलांनी चप्पल खरेदीचा बहाणा करत चप्पल दुकानातील चपला चोरी करतानाचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याने बाजारपेठेत (Indapur News) एकच खळबळ उडाली.
सदरची घटना ही शुक्रवारी दुपारी 1:30 वा.चे सुमारास व्यंकटेश शु वल्ड इंदापूर या दुकानात घडली आहे. दुकानदार ग्राहकाला चपला दाखवत असताना चार ते पाच बुरखाधारी महीलांनी चप्पल खरेदीच्या बहाण्याने दुकानात प्रवेश केला व त्यातील एकीने
दुकानदाराला चप्पल दाखविण्याचा बहाणा करून गुंतवुन ठेवले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बाकी इतर महिलां साथीदारांनी सदर दुकानाचे कपाटातील चपलांचे बाॅक्स हाताने स्वतच काढुन स्वत:च्या पिशवीत भरले. हे घडत असताना हा चोरीचा सर्व प्रकार सीसी टीव्हीत कैद झाला आहे. दुकानदाराला मात्र याचा मोठा आर्थीक फटका बसला असुन बाजारपेठेत व्यापारी वर्गामध्ये घबराटीचे वातावरण आहे.
महीलांनी तोंडाला रुमालाने बुरखा बांधल्याने चोरी करणार्या महीलांचे चेहरे ओळखणे अवघड बनल्याचे दिसुन येत आहे. तर मागील काही दिवसापुर्वी इंदापूर शहरात मोटारसायकल स्वाराला पैसे पडल्याचा बनाव करून भर रस्त्यात दुपारच्या वेळेला 2 लाख 33 हजाराला लुटल्याचा प्रकार ताजा असतानाच आणखी एका घटनेने इंदापूरात (Indpaur News) अशा प्रकारच्या घटना वाढल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
Web Title : Indapur News | In Indapur, a gang of women wearing burqas was caught on CCTV while stealing from a sandal shop.
MPSC Exam | राज्य सेवा परीक्षेच्या जागा वाढवल्या, MPSC कडून नवं परिपत्रक जाहीर
Pune Police Crime Branch | 7 वर्षे फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या