इंदापूर : बहुजननामा ऑनलाईन – बावडा (ता.इंदापूर) येथे सकाळी ९:३० वा.च्या सुमारास महाराष्ट्र बँक चौकातील वडापावच्या गाड्याशेजारी बसलेल्या युवकावर त्याच गावातील एकाने चाकुने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. शाहरूख बशीर शेख (वय २१ वर्षे),रा. बावडा, ता.इंदापूर असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने इंदापूरात हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना इंदापूर पोलीसांत फिर्याद दीली असल्याची माहीती इंदापूर पोलीसांनी दीली आहे..
बापू निकम (पूर्ण नाव माहीत नाही) रा. बावडा,ता. इंदापूर, जि.पूणे. असे हल्ला करणार्या आरोपीचे नाव आहे. रविवार दिनांक २२ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ९:३० वा.चे. सुमारास फिर्यादी हे बावडा येथील महाराष्ट्र बँक चौकात वडापावच्या गीड्याशेजारी बसले असताना बापू निकम हा पांढर्या रंगाच्या अॅक्टीवा स्कुटी(नंबर माहीत नाही) गाडीवरून हातात चाकु घेवुन फिर्यादी यांचेजवळ येवुन माझा भाऊ रणजित निकम यास तु बोललास का.? असे म्हणुन हातातील चाकुने फिर्यादी याचे मानेवर,हातावर,पोटात, डोक्यावर वार केले व स्कुटी गाडी घेवुन पळुन गेला.
फिर्यादी हे जखमी होउन जमीनीवर पडले असताना जखमीचा भाऊ आलम व त्याचा मीत्र अलताफ सय्यद यांनी जखमी शाहरूख शेख याला मोटारसायकलवरून इंदापूर उपजिल्हा रूग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल केले. सध्या जखमी फिर्यादी यांचेवर इंदापूर उपजिल्हा रूग्णांलयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु असुन याबाबतची फिर्याद इंदापूर पोलीसात दाखल करण्यात आली असुन पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.