Ind vs SA T20 | चक्क अम्पायरच नियम विसरले, गुवाहाटीत अम्पायर्सने केली ‘ही’ मोठी चूक

गुवाहाटी : वृत्तसंस्था – Ind vs SA T20 | आयसीसीने (ICC) 1 ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या काही नियमांमध्ये बदल केले आहेत. सध्या भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात टी 20 मालिका (Ind vs SA T20) सुरु आहे. पण याच मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात मात्र अम्पायर्सना (Umpire) या नियमांचा विसर पडल्याचे दिसले आणि त्यांनी एक मोठी चूक केली. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर 238 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात काहीशी खराब झाली. याचदरम्यान या अम्पायर्सकडून ती चूक झाली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
https://twitter.com/BCCI/status/1576603282042077184
नवीन बॅट्समनऐवजी डी कॉक स्ट्राईकवर
या सामन्यात दुसऱ्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर दक्षिण आफ्रिकेचा रिली रुसो दिनेश कार्तिककडे (Dinesh Kartik) कॅच देऊन तंबूत परतला.
त्यावेळी बॅट्समन एकमेकांना क्रॉस झाले.
पण 1 ऑक्टोबरपासून लागू झालेल्या नव्या नियमानुसार नवा बॅट्समन एडन मारक्रम (Aidan Markram) स्ट्राईक घेणं अपेक्षित होतं.
पण तसं न होता अर्शदीप सिंगच्या (Arshdeep Singh) त्या ओव्हरचा पुढचा बॉल क्विंटन डी कॉकने
(Quinton de Kock) खेळला. तेव्हा अम्पायर्सच्या पण ते लक्षात आले नाही आणि हि चूक घडली. (Ind vs SA T20)
काय आहे नवा नियम?
क्रिकेटच्या जुन्या नियमानुसार एखादा बॅट्समन कॅच आऊट झाला आणि त्यादरम्यान धाव घेताना दोन्ही बॅट्समन एकमेकांना क्रॉस झाल्यास नॉन स्ट्राईकर पुढचा बॉल खेळायचा.
पण आता नव्या नियमानुसार जरी दोघे बॅट्समन क्रॉस झाले असतील तरी आऊट झालेल्या बॅट्समनच्या जागी येणारा नवा बॅट्समन पुढचा बॉल खेळेल.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Ind vs SA T20 | umpires made big mistake after changes in law in india vs south africa t20 match sport news
हे देखील वाचा :
Pune Crime | सिक्युरिटी गार्डनेच केली सोसायटीच्या सभासदाला मारहाण; पिसोळी येथील घटना
Pune Crime | हॉटेल मॅनेजरने घातला साडेतीन लाखांना गंडा; मंगळवार पेठेतील प्रकार
Comments are closed.